Homeless old lady made her house in tree fence during lockdown
Homeless old lady made her house in tree fence during lockdown 
पिंपरी-चिंचवड

Video : लॉकडाऊनमध्ये निराधार आजीनं झाडाच्या कुंपणात बनवलं घर!

सुवर्णा नवले

पिंपरी : लॉकडाउनपासून निराधार आजी कासारवाडीतील शंकरवाडी रस्त्यावरच चूल मांडून आहेत. झाडाच्या कुंपणाचा आधार घेऊन जुनी फाटकी वस्त्रे व रस्त्यावरचा पालापाचोळा गोळा करून त्यांनी डोक्‍यावर छत तयार केलं आहे. तात्पुरता निवारा मिळवला आहे. मात्र, मोठ्या कष्टाने उभारलेला निवारा पावसात गळून पडतो. त्यानंतर त्या पुन्हा भंगारातून सामानाची शोधाशोध करून नवं छत तयार करतात. पोटातील आग स्वस्थ बसू देत नाही. चार महिन्यांपासून घर-संसाराचा त्यांचा हा नित्य क्रम सुरु आहे. जोराचा पाऊस आला की, त्या रेल्वे स्टेशनचा आधार घेतात. रस्त्यावरच्या चूलीनेही पावसात साथ सोडली की, त्या पुन्हा अन्न-पाण्याच्या शोधात सैरावरा भटकत फिरतात. अन्‌ पुन्हा रस्त्यावर मांडलेला संसार जुळविण्याचा कसाबसा प्रयत्न करतात. मात्र, त्यांची ही जिद्द पाहून परिसरातील नागरिकही त्यांच्या मदतीला धावून जात आहेत.

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

आजीला कोणतीही भाषा समजत नाही. रस्त्याने ये-जा करणारे पादचारी तिला नाव विचारतात. कोणी खायला देईल या आशेने तिने आजूबाजूला रिकामे डब्बे व झाडाला पिशव्या लटकवलेल्या आहेत. शेजारील दुकानदारही तिला जमेल तसे रोज खाण्याच्या वस्तू आणून देतात. समारेच एक अंडी विक्रेता आहे ते मदत करतात. चहाची टपरी आहे ते चहा देतात. यावरच त्यांचा रोजचा उदरनिर्वाह सुरु आहे. पावसात आजींच्या पायाला जखमा झालेल्या आहेत. त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. मात्र, कोरोनामुळे कोणी जवळ जात नाही. नागरिकांनी तोंडाला लावण्यासाठी मास्क दिला मात्र तो पुरेसा नाही. नातेवाईक आहे मात्र, ते संभाळत नसल्याचे परिसरातील नागरीक सांगत आहेत. रस्त्यावरचा एक गृहस्थ म्हणाला, 'की त्यांना भोजपूरी भाषा समजते तेव्हा त्या चांगल्या बोलतात. सर्वांशी गप्पा मारत बसतात.' त्यांना मराठी व हिंदी भाषा बोलता येत नाही.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात आहे असे दृश्‍य

लॉकडाउनपासून बरेच ज्येष्ठ नागरीक रस्त्यावर दिसत आहेत. ज्यांचे अन्न-पाण्याविना हाल होत आहेत. काही जण भीक मागूनच आपला रोजचा आला दिवस ढकलत असल्याचेही चित्र आहे. तर काही नवे चेहरे सिग्नलवर तग धरून बसलेले असतात. तर काहींनी यापूर्वी ठिकठिकाणी घरकाम किंवा स्वच्छतेची कामे केलेली आहेत. मात्र, त्यांना आता हाताला काम न मिळाल्याने भीक मागत आहेत. यातील काही जण मनोरुग्ण आहेत. मात्र, काही जण चांगल्या मनस्थितीतीलही आहेत. घरातील बिकट अिार्थक परिस्थितीमुळे त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT