eve.jpg 
पिंपरी-चिंचवड

तळेगावच्या पर्यावरणप्रेमी अवलियाची कमाल

सुवर्णा नवले

पिंपरी : सेवानिवृत्ती हा आयुष्यातील आरामदायी टप्पा. मात्र, या वळणावर एका अवलियाने पर्यावरण जपण्याचा ध्यास उराशी बाळगला आहे. आजही डोंगराच्या पायथ्यापासून हातात रोपे, बिया आणि पाण्याचे कॅन घेऊन भल्या सकाळी ते डोंगरावर रोपे लावण्यासाठी पोचत आहेत. सध्या तळेगावातील चौराई डोंगरावर 62 वर्षाचे आजोबा सेवानिवृत्तीनंतर हिरवाई फुलवीत आहेत. त्याचबरोबर डोंगरामध्ये उतरून कचरा गोळा करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

तळेगाव दाभाडे मस्करनेस कॉलनीत राहणारे काळूराम श्रीपती कुंभार. आकुर्डीतील खासगी कंपनीत कामाला होते. त्यानंतर निसर्गात रमायचे त्यांनी ठरवले. निसर्ग प्रेमींचा गरवारे वॉल रोपस लिमिटेड ट्रेकिंग नावाचा ग्रुपही आहे. सेवानिवृत्तीनंतरही ते एका खासगी कंपनीत कामाला जात आहेत. त्याचबरोबर त्यांनी केवळ ट्रेकिंग न करता डोंगरावर वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. हा आता त्यांचा छंदच झाला आहे. बऱ्याच किल्ल्यावरही त्यांनी भ्रमंती केली आहे. या कामाचा हुरूप पाहून परिसरातील युवकही आता मदतीस धावून येत आहेत. आजोबांना तरुणांची साथ मिळाल्याने काम जोमाने सुरू झाले आहे. त्यांना या कामात सध्या काळुराम कुंभार, संदेश येवले, पंकज कपिले, गिरीश तापकीर, सौरभ बोरकर, प्रशांत मुऱ्हे, प्रदीप पळोदे, आशिष पाटील, अमोल पवार, जितेंद्र बांघरे, मिलिंद कुलकर्णी मदत करीत आहेत.

वृक्षारोपण करताना त्यांना डोंगरावर मोर पण खूप भेटतात. त्यांना ही ते धान्य ठेवतात. शिवाय भटक्‍या कुत्र्यांचीही भूक भागवितात. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा दिवसही छान जातो. तळेगाव नगरपालिका देखील त्यांना या कामात मदत करत आहे. नजीकच असलेल्या जलशुद्धीकेंद्रातून ते कॅनमध्ये पाणी भरून वर नेतात. कॉलनीतील नागरिकही त्यांना रोपे आणून देतात. सध्या डोंगरांवर कडुनिंब, चिंच, चिक्कू, वडाची झाडे फुलविली आहेत. जवळपास 50 च्यावर झाडे सध्या डोंगरावर लावली आहेत. एवढंच नव्हे तर लावलेल्या झाडांची ते काळजी घेत आहेत. वेळेत झाडांना पाणी व देखभाल दुरुस्ती करत आहेत.

प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट सोपी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मला रमायला आवडते. मनाला समाधान मिळते. गाढ झोप लागते. भविष्यातील पर्यावरणावर येणारे संकट ओळखायला हवे. त्यादृष्टीने हे माझे छोटे पाऊल आहे.''
- काळूराम कुंभार, निसर्गप्रेमी, तळेगाव दाभाडे

Editied by : sagar shelar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT