Rajan-Shrivas
Rajan-Shrivas 
पिंपरी-चिंचवड

‘किनारा’च्या आसऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर ‘स्माइल’

सकाळवृत्तसेवा

छत्तीसगडमधून भरकटलेला तरुणाला दिला आधार
कामशेत - घरदार गाव सोडून तो आला. पोटात अन्नाचा कण नाही की अंगावर कापडे. तो व्यसनाच्या धुंदीतच भटकत होता. वाढलेली दाढी, लांब लचक केस, मळका सदरा अन तशीच पॅन्ट. तो ओंगळच दिसायचा. त्याकडे पाहून जाणारा येणारा तोड मुरडत पुढे जायचे. तो किती दिवस कुठे कुठे भटकला हे त्यालाच ठाऊक. एका सामाजिक कार्यकर्त्याला तो कामशेतच्या रस्त्यावर भटकताना आढळला त्यांनी त्याला आसरा दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजन श्रीवास (वय २९, रा. विलासपूर छत्तीसगड) असे या भरकटलेल्या तरुणाचे नाव. किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्टच्या संचालिका प्रिती वैद्य यांना कामशेत पवना रस्त्यावर तो भटकताना दिसला. त्यानी त्याची विचारपूस केली. तो घाबरलेला होता. त्या त्याला वृद्धाश्रमात घेऊन गेल्या. तेथे दाढी करून अंघोळ घालून नवीन कपडे दिले. खाऊ घातले. आरोग्य तपासणी केली. तेव्हा कळाले तो २५ दिवस जेवला नव्हता. त्याला गांजाचे व्यसन लागल्याने त्यांनी त्याला स्माइल व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष हर्षल पंडित यांच्याशी संपर्क साधला.

स्माइलच्या सदस्यांनी किनारामध्ये जाऊन त्याला भेटले. कामशेत पोलिस ठाणे येथे नोंद करून उर्से येथे नव्याने सुरु झालेल्या व्यसनमुक्ती केंद्रात त्याच्या घरच्यांचा पत्ता मिळेपर्यंतच्या पुनर्वसनासाठी घेऊन आले. त्याला नीट बोलता येत नव्हते. बरेच दिवस पोटात अन्न नसल्याने त्याला सुरुवातीला त्रास झाला. त्याच्या पोटात दुखणे, उलटी होणे, मळमळ, जुलाब असे त्रास त्याला झाले. दोन तीन दिवसांनी त्याची पचनशक्ती पूर्ववत होऊ लागली. आता तो व्यवस्थित जेवतो, त्रास होत नाही. हळूहळू त्याचा आवाजही मोठा झाला. आता त्याची ‘स्माइल’शी संवाद साधण्याची मनःस्थिती तयार झाली.

स्माईलचे राहुल केळकर यांनी त्याच्याशी संवाद साधला. त्याने नाव  राजन/राजेंद्र श्रीवास (ठाकूर) रा. विलासपूर, सदरपूर, छत्तीसगड, घराजवळ शिवलिंग आहे, घरात आई वडील आणि भाऊ आहेत. थोडीफार शेतजमीन आहे. विडी व गांज्याचे व्यसन असल्याचे त्याने सांगितले. भावाशी भांडण झाले. त्याने मारल्याच्या रागातून राजनने घर सोडले. ट्रेन, बस आणि बरेच चालून तो इथे पोचला. तो कुठे पोचला हे तो सांगू शकत नाही. इकडे आल्यावर त्याने फक्त भीक मागितली. सिगारेट विडीची रस्त्यात पडलेली थोटके उचलली. अधूनमधून त्याला गांजाही मिळत असे, असेही तो म्हणाला. त्याला आज या सामाजिक संस्थांनी आधार दिला. माणुसकी व सामाजिक भावनेतून मदत करणाऱ्या या संस्था सामाजिक दायित्व निभावत असल्याच्या भावना अनेकांनी बोलून दाखविले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT