Pimpri_Cemetery 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : दफनभूमीला पडलाय महावितरणच्या हायटेन्शन तारांचा विळखा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लिंकरोड-भाटनगर येथील ख्रिस्ती दफनभूमीमध्ये नवीन कमान उभारण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून या कमानींच्या खांबावर महावितरणच्या उच्चदाबाच्या विजेच्या तारांचा विळखा पडला आहे. तारा डोक्‍यावरून लोंबकळत असून, तसेच पावसामुळे रस्त्यावरील उघड्या केबल्समुळे धक्का लागून शॉक लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यविधी करण्यासाठी दफनभूमीत येणाऱ्या पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

शहरात अनेक ठिकाणी महावितरणने भूमिगत विद्युत जोडणी केली आहे. पण अद्याप काही ठिकाणी भूमिगत विद्युत जोडणी केली नाही. परिणामी, रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्‍यावरून लोंबकळत आहेत. वारंवार महावितरण आणि महापालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हिंदू स्मशानभूमीपासून ते ख्रिश्‍चन दफनभूमीपर्यंत भूमिगत विद्युत जोडणी केली नाही. मात्र, भाटनगरजवळील झोपडपट्टी परिसरात विद्युत जोडणी केली आहे. परंतु भूमिगत जोडणी केल्यानंतर काही घरगुती वीजपुरवठा करणाऱ्या या केबल्स खांबावरच 'जैसे थे' असल्यामुळे आजूबाजूच्या घरांना विळखा घातल्याचे चित्र पाहावयास मिळते. या परिसरात अनेक घरांसमोर तारा लोंबकळत असून काही ठिकाणी या तारांचे जॉइंट मारले असून, त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे आवरण नसल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. 

"या कमानीवरच्या केबल्सचे इन्शुलेशन गेले आहे. दीड वर्षात चार वेळा केबल बदलली आहे, अधूनमधून या वायरींगमधून वारंवार ठिणग्या पडत असतात. ही परिस्थिती नित्याची झाली आहे. परिणामी, दफनभूमीतील कर्मचारी घाबरले आहेत. याबाबत अनेक वेळा सांगूनही महावितरण आणि पालिका अधिकारी ऐकत नाही.'' 
- राजेश केळकर, केअर टेकर, ख्रिश्‍चन दफनभूमी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Car Accident: पुण्यात भीषण अपघात! झाडाला एवढी जोरदार धडक की उन्मळून पडले, कारचा चक्काचूर... चालक स्टेअरिंगमध्ये अडकला

Bride Runs Away With Cash : लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरी फरार; पती मिठाई आणायला जाताच रस्त्यात सोडून दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठा बदल! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती?

Nashik Shalarth Scam: १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठा ट्विस्ट; फार्महाऊसवर लपलेल्या संस्थाचालकाला अटक, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Local: लोकलचा स्पीड आणखी वाढणार, दररोज ४,००० फेऱ्या; रेल्वे प्रशासनाची नवी योजना, कधीपासून होणार सुरु?

SCROLL FOR NEXT