ST
ST Sakal
पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्राची प्रवासी वाहिनी ‘लालपरी’ आता नव्या रूपात

रमेश मोरे

जुनी सांगवी - महाराष्ट्राची प्रवासी वाहिनी म्हणून जनसामान्यांच्या मनामनात स्थान असलेली लालपरी एसटी (ST) आता नव्या रूपात रस्त्यावर धावणार आहे. पूर्वीची कुरकूरणारी, खळखळणारी एसटी आरामदायक होऊन सुरक्षाविषयक मजबुतीकरण व डिजिटल युगातील साधनांचा वापर करून प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या रूपात सज्ज झाली आहे. (Maharashtras Travel ST is now in a New Structure)

पूर्वीची लालपरी आता लाल, पांढऱ्या रंगात दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील विभागीय कार्यशाळेत एकूण तीन हजार एसटी बस रूपांतरित करण्यात येत आहेत. जून २०१८ पासून गाड्यांचे रूपांतर करण्याचे काम या कार्यशाळेत सुरू आहे. पूर्वीची ॲल्युमिनियममधील बॉडी आता माईल स्टीलमध्ये रुपांतरीत करण्यात आल्याने मजबुतीकरण मिळाले आहे. पूर्वी अपघातात ॲल्युमिनिअम बॉडी कमकुवत ठरायची. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे. माईल स्टील बदलामुळे आता अपघातातील धोका कमी होण्यास मदत होणार आहे, असे या विभागाकडून सांगण्यात आले.

बसमध्ये आधुनिक उपकरणे

संकटसमयी बाहेर पडण्यासाठी वर व मागे व्यवस्था केली आहे. दरवाजा नीट लागला नसल्यास सायरन उपकरण बसविले आहेत. अग्निरोधक दोन सिलिंडर यात बसविले आहेत. प्रवाशांसाठी या नवीन बसमध्ये तक्रार वही, मोबाईल चार्जिंग पॉइंट, पांढरे एलईडी दिवे तर रात्रीच्या वेळी निळा प्रकाश कायम केला आहे, अशा सुविधा या गाडीत केल्या आहेत. तर पूर्वीचा लाल रंग कमी करून त्या जागी आता पांढऱ्या रंगाने जागा घेतली आहे. लाल रंग एक चतुर्थांश ठेवण्यात आला आहे. लालपरी आता पांढऱ्या लाल रंगात आधुनिक उपकरणांसह धावणार आहे.

कार्यशाळेची क्षमता

येथे दिवसाला दोन गाड्या तयार होतात.तर आत्तापर्यंत येथून तीन हजार गाड्या रुपांतरीत केल्या आहेत. पुणे विभागीय परिवहन कार्यशाळेची १९४८ मध्ये स्थापना झाली. एकूण २८ एकर परिसरात दापोडी येथे ही कार्यशाळा उभी आहे. यात बांधणी विभाग,

इंजिन विभाग, टायर विभाग, असे तीन मुख्य विभाग व त्या विभागाला जोडून अन्य विभाग

आहेत. येथे एकूण ४०७ कर्मचारी या कार्यशाळेत काम करतात.

हे आहेत बदल

  • जुनी ॲल्युनियम बॉडीबदलून त्याजागी माईल स्टील वापरण्यात आले आहे.

  • समोरच्या चेहऱ्यात ही बदल करत तर पूर्वीची पुढची काच ९५० मी. मी. ऐवजी आता १२५० मी. मी. अशी भव्य केली आहे.

  • ४२ प्रवाशांची आसनक्षमता असून यात थांबा अनाऊंसिंग माईक सिस्टम व रूट डिजिटल बोर्ड या गाडीत लावले आहे.

  • एटीएस झिरो ५२ या सरकारच्या नियमानुसार या गाडीत आमूलाग्र बदल केले आहेत.

  • आता जिपीएस यंत्रणेमुळे गाडीचे ठिकाण कळणार

  • प्रत्येक आसनाला पॅनिक टायमिंग बटण लावले

  • पूर्वीचे छतावर लगेज कॅरिअर काढून आता ते खाली बाहेरील बाजूस आतल्या आत राहणार आहे.

  • सामान कक्ष, राखीव टायर कक्ष, बॅटरी कक्ष, अशी व्यवस्था करून नावे दिली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT