March in Daund MP Sanjay Raut Demand inquiry of Bhima Patas Cooperative Sugar Factory pune
March in Daund MP Sanjay Raut Demand inquiry of Bhima Patas Cooperative Sugar Factory pune sakal
पिंपरी-चिंचवड

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ दौंड मध्ये मोर्चा !

प्रफुल्ल भंडारी

दौंड : राज्यसभेचे वरिष्ठ खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामधील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी केल्याच्या निषेधार्थ दौंड शहरात मोर्चा काढून सभा घेण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजप आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी काढलेल्या या मोर्चा व सभेत संजय राऊत यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली.

दौंड शहरातील राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढून जिल्हा बॅंक शाखेसमोरील रस्त्यावर निषेध सभा घेण्यात आली. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांच्यासह शिवाजी सोनवणे, नंदकुमार पवार, अॅड. बापूराव भागवत, तानाजी दिवेकर, हरिश्चंद्र ठोंबरे, वैशाली आबणे, शीतल कटारिया, ज्ञानदेव ताकवणे, रवींद्र कांबळे, आदी उपस्थित होते.

भीमा पाटस कारखान्याचे सभासद व दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया म्हणाले, पत्राचाळ प्रकरणात तुरूंगात जाऊन आलेले खासदार संजय राऊत हे कारखान्यावर पाचशे कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत.

कारखान्याच्या विरोधातील काही मंडळी लोकशाही व्यवस्थेत दिलेल्या संधींचा वापर करून वार्षिक सर्वसाधारण सभेत येऊन बोलत नाही आणि निवडणूक पण लढवत नाही, मात्र कारखान्यावर मोर्चा काढतात. राहुल कुल यांचे विरोधक कृतघ्न असून ते कोणत्याही थराला जातील, त्यामुळे स्वाभिमान जागृत ठेवत श्री. कुल यांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे.

संजय राऊत यांनी कारखान्यातील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी केल्यामुळे आमदार राहुल कुल यांचे नाव देशभरात पोचल्याने त्यांचे आभारच मानले पाहिजे. परंतु श्री. राऊत हे देशाला लागलेला कलंक आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी संचालक नंदकुमार पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT