पिंपरी : जिथं संकोच व व्यवसायाची लाज नसेल तिथं माणूस कोणताही व्यवसाय नेटाने करू शकतो. वीस रुपयांची लाल नोट एक इसम मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर फडकवित होता. सर्वांना आश्चर्य वाटत होते. सर्व जाणाऱ्या-येणाऱ्या वाहन चालकांचे त्याकडे लक्ष जात होते. ते देखील रहदारी असणाऱ्या रस्त्यावर. काही जण राहवत नसल्याने त्याच्या जवळ जाऊन हा काय प्रकार आहे तो पाहण्याचा प्रयत्न करत होते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कासारवाडी येथे राहणारे मुसा केळी विक्रेते अवघ्या वीस रुपये डझनामध्ये केळी विकत होते. मार्केटिंगचा हा नवीन फंडा असल्याने सगळेच जण हरखून जात होते. त्यानंतर केळी विकत घेण्यासाठी टेम्पोकडे नागरिकांनी धाव घेतली. काही तासातच टेम्पोभरून आणलेली केळी स्वस्तात मिळाल्याने ती संपली देखील.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाच्या संसर्गापासून नागरिक आहारावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे फळे खाण्याकडे सर्वांचाच कल वाढला आहे. आजही सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडायचे असल्यास केळी फस्त करत आहे. गोरगरिबांना आजही केळी खायला परवडत आहेत. काही दिवसांपासून मोठ्या केळ्यांचा भाव 50 ते 60 रूपये आहे तर लहान केळ्यांचा भाव 40 रुपये डझन आहे. मात्र, अवघ्या वीस रुपयांत एक डझन केळी मिळत असल्याने कासारवाडीजवळ असलेल्या शंकरवाडीनजीक नागरिकांनी केळी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
आत्महत्या का घडतात? काय आहेत करणे वाचा सविस्तर
टेंभुर्णी येथून ही केळी विक्रीसाठी आणण्यात आली होती. शिवाय आज पहिल्याच दिवशी केळी विक्रीचा आनंद विक्रेत्याच्या चेहऱ्यावर तरळत होता. इतरवेळी ते हातगाडीवर फिरून केळी विक्रीचा व्यवसाय करत असत. त्यावेळी देखील एवढा खप होत नसल्याचे त्यांनी सांगितले. रस्तोरस्ती फळ, बॅगा, मास्क, शोभेच्या वस्तूंसह बरेच विक्रेते दृष्टीस पडत आहेत. मात्र, प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात नोट दाखवून ग्राहकाला आकर्षित करण्याचा हा फंड निराळाच ठरला आहे.
सीमेवर २० जवान कशासाठी शहीद झाले? याचे उत्तर द्या; आपचा केंद्र सरकारला सवाल!
सोसायटीसह अनेक परिसरात नागरिक कोरोनामुळे हातगाड्यांना बंदी घालत आहे. त्यामुळे भीतीपोटी दारावरील भाजीपाला व फळे खरेदी करणे नागरिकांनी बंद केले आहे. तसेच दरवर्षी पावसाळ्यात निर्यात होणारी केळी यावर्षी विकली न गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाउनमध्ये व्यवसायात आलेली मरगळ प्रत्येकजण दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही देखील तेच करतोय. दुसरीकडे कुटुंब जगविण्याची धडपड असल्याचे कासारवाडीच्या मुसा केळी विक्रेत्याने सांगितले.
सासवडला कोरोनानं घेरलं; रुग्णांची संख्या वाढतेय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.