Crime
Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

आमदार पुत्र सहा दिवस उलटूनही फरार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या (Contractor) कार्यालयात घुसून कामगारांवर (Employee) प्राणघातक हल्ला (Murderer Attack) केल्याप्रकरणी तसेच सुपरवायझरचे अपहरण (Kidnapping) करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांचा मुलगा सिद्धार्थ (Siddharth Bansode) याच्यासह साथीदारांवर गुन्हा Crime) दाखल आहे. मात्र, घटनेला सात दिवस उलटूनही आमदारपुत्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या आमदार पुत्राच्या शोधासाठी तीन पथके ठिकठिकाणी रवाना केली असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krushna Prakash) यांनी दिली. (Three squads of police on the trail of the MLAs son He escaped after six days)

आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे, त्यांचे पीए व इतर आठजण यांनी मंगळवारी (ता. ११) एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड मुंबई या ठेकेदार कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात शिरून कामगारांना बेदम मारहाण केली. धनराज बोडसे, अमोल कुचेकर यांना हाताने तर विनोदकुमार रेड्डी यांना लोखंडी टॉमी सारख्या शस्त्राने डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह साथीदारांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे.

तर दुसरी घटना बुधवारी (ता. १२) घडली. ११ मे रोजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी पवार आमदार बनसोडे यांना उलटे बोलले असल्याचा समज आरोपींचा झाला. त्यातुन सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान आणि त्यांचे दहा ते पंधरा साथीदारांनी १२ मे रोजी सकाळी ११ वाजता पवार यांचे हेडगेवार भवन, आकुर्डी येथील त्यांच्या ऑफिसमधून बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी अपहरण केले. त्यांना काळभोरनगर येथील एका कंपनीच्या कार्यालयात आणले. तिथे सिद्धार्थ बनसोडे व साथीदारांनी हाताने, लथाबुक्क्यांनी, चामडी पट्टयाने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. सिद्धार्थ याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणीही सिद्धार्थ याच्यावर अपहरण, खुनी हल्ल्याचा गुन्हा सिद्धार्थ बनसोडे याच्यावर दाखल आहे.

या घटनांना सात दिवस उलटूनही आमदार पुत्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही. रोहित उर्फ सोन्या गोरख भोसले, सुलतान इम्तियाज कुरेशी, हृतिक उर्फ भावड्या लक्ष्मण वाघमारे, अतिश महादेव जगताप या चौघांना अटक केली आहे.

दरम्यान, याबाबत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, या गुन्ह्यात आतापर्यत सतरा आरोपी निष्पन्न झाले आहेत. तर चार जणांना अटक केलेली आहे. सिद्धार्थ बनसोडे याचाही शोध सुरु आहे. घरासह तो राहत असलेल्या हॉटेल, फ्लॅट वर शोध घेतला. मात्र, तो हाती लागला नाही. फोनही बंद आहे. योग्य कल्माखळॆ गुन्हा दाखल असून पाठपुरावा सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. कोणालाही सोडणार नाही. यामध्ये कसलाही राजकीय दबाव नाही.सर्व कारवाई निष्पक्षपातीपणे होईल. तसेच आमदार बनसोडे यांच्यावर गोळीबार झालेल्या ठिकाणच्या काचेच्या केबिन व पायरीवरही गोळी लागल्याचे निशाण दिसून येत नाही. मात्र, पुंगळी सापडली आहे. याबाबतचा तपास तज्ञांकडून सुरु आहे.

आमदारांवरील गोळीबार प्रकरणातील दोघे फरार

आमदार बनसोडे यांच्यासह त्यांचा मुलगा व कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी), संकेत शशिकांत जगताप, श्रीनिवास बिरादार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सावनकुमार रमेश सलादल्लू (वय ४८, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पवार काम करत असलेल्या कंपनीत स्थानिक तरुणांना नोकरीस घ्यावे आमदार अण्णा बनसोडे यांनी चर्चेसाठी पवार याला बोलावले. बुधवारी (ता. १२) दुपारी पवार त्याच्या दोन साथीदारांसोबत आला. चर्चेदरम्यान शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी देत आरोपीने आमदार बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार केला. या गुन्ह्यात तानाजी पवार हा पोलिसांच्या ताब्यात असून जगताप व बिरादार फरारी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT