Mother and one and half year daughter won the battle against Corona pimpri 
पिंपरी-चिंचवड

आईची द्विधा मन:स्थिती; कोरोनामुळे एक बाळ हॉस्पिटलमध्ये, तर दुसरं बाळ घरी

मंगेश पांडे

पिंपरी : कोरोनाने गाठलेल्या दीड वर्षाच्या चिमुरडीची देखभाल करताना आईलाही संसर्ग झाला. रुग्णशय्येवर असलेल्या या माउलीचं एक पिलू तिच्याबरोबर रुग्णालयात, तर दुसरं घरी. त्यामुळं शरीराने रुग्णशय्येवर असलेल्या या माउलीचं चित्त मात्र आपल्या चिमुरड्यांवर होतं. आजारातून बरे होऊन लहानगीसह घरी गेल्यावर मोठ्या मुलीने गळ्यात पडत अन्‌ अश्रूंना वाट मोकळी करून देत कोरोनावर मात केलेल्या माय-बहिणीचं स्वागत केलं. 

भोसरीतील घुलेवस्ती येथील दीड वर्षाच्या खुशीला ताप आल्याने तिला 29 जूनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर आईसह तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी तिला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) दाखल करण्यात आले. सुरुवातीचे दोन-तीन दिवस चिमुरडीला त्रास जाणवत होता. बाळाच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांना काळजी वाटायची. काळजीपोटी साऱ्यांनी रात्री जागून काढल्या. मात्र, हळूहळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. त्यामुळे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच बाळासोबत असलेल्या आईलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावरही तेथेच उपचार सुरू करण्यात आले. 


बाळाची करमणूक व्हावी, चिडचिड करू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनानेही उत्तम व्यवस्था केली. या विभागात झोका, बॅट-बॉल, लाकडी घोडे, खुळखुळे आदी खेळण्यांसह बालगीत ऐकण्यासाठी साउंड सिस्टिम व टीव्हीचीही व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे घरी आहोत, की रुग्णालयात याचा कसलाही भास लहानग्यांसह त्यांच्या पालकांनाही झाला नाही. सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, बिस्कीट, दूध, फळे असा सकस आहार बाळासह आईलाही दिला गेला. दररोज डॉक्‍टर, नर्सकडून घेतली जाणारी काळजी यामुळे चिमुकली व तिची आई तेरा दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. त्यांना 10 जुलैला डिस्चार्ज देण्यात आला. 

 कौतुकास्पद : कोरोनाशी लढण्यासाठी तरुण अभियंत्यानी बनवलं 'सॅनिशूटर', कसं काम करत वाचा
 

दरम्यान, या कालावधीत या महिलेची दुसरी नऊ वर्षीय मुलगी सोनल ही मामा व आजोबांसोबत घरी असायची. "त्या' आईचं एक बाळ आजाराशी लढा देत होतं, तर दुसरं बाळ घरी होतं. त्यामुळे घरच्या बाळाचीही काळजी आईच्या मनात होती. ज्याप्रमाणे घार जरी उंच आकाशात झेप घेत असली तरी तिचे चित्त मात्र पिलांपाशीच असते, असा प्रसंग येथे पाहायला मिळाला. अखेर बाळासह आईही कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी पोहोचल्या व तिची दोन्ही पिले तिला बिलगली. 


आईला बिलगण्याची आस 
या कालावधीत घरी असलेल्या नऊ वर्षीय सोनलने आईची आठवण काढल्यानंतर तिचा मामा तिच्या आईला फोन लावून द्यायचा. व्हिडिओ कॉलवर दोघी एकमेकींशी बोलायच्या. यावेळी बोलत असताना सोनलला आईला बिलगण्याची आस दिसून यायची, असे तिच्या मामाने सांगितले.

नोकरदार महिलांना करावी लागतेय दुहेरी कसरत, लॉकडाउनमध्येही नव्हती उसंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT