Crime 
पिंपरी-चिंचवड

चिंचवडमध्ये दोन गटात हाणामारी; कोयते, तलवारीने प्राणघातक हल्ला

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - चिंचवड येथील विद्यानगर येथे दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये कोयते, तलवारीने एकमेकांवर हल्ला केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. 

याप्रकरणी विक्रम भंवरसिंग राजपूत (वय 22, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिफाना स्पेशल काळे, करण स्पेशल काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, किरण स्पेशल काळे व गब्बर पवार (सर्व रा. विद्यानगर, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.31) रात्री अकराच्या सुमारास आरोपी तिफाना काळे ही फिर्यादी विक्रम यांच्या घरासमोर आली. "तुम्ही आमच्या घरावर दगड का मारले' असा प्रश्न केला. त्यावर विक्रम यांनी आम्ही दगड मारले नसल्याचे सांगितले. त्यावर आरोपी तिफाना यांनी तू घराबाहेर ये बघतेच तुला असा दम भरला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी विक्रम आरोपीच्या पाठीमागून त्यांच्या घराजवळील खदाणीजवळ गेले त्यावेळी आरोपीची दोन मुले व आणखी एकजण हातात लोखंडी कोयता घेऊन उभे होते. फिर्यादी याठिकाणी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत कोयत्याने त्याच्यावर वार केले. मात्र, फिर्यादी यांनी ते चुकवले, फिर्यादी यांचा बचाव करण्यासाठी तिथे आलेला त्यांचा भाऊ व भावाचा मित्र यांना देखील आरोपीने कोयत्याने मारहाण केली. या हाणामारीत फिर्यादी तसेच त्यांच्या भावावर कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. 

तसेच याप्रकरणी तिफाना स्पेशल काळे (वय 48, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनीही पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम भंवरसिंग रजपूत, अंकुर आजेशाने पवार, रोहित कुरमे, अक्षय काळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आकाश भंवरसिंग रजपूत याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी तिफाना यांच्या घरावर गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास दगड पडू लागल्याने त्या व त्यांचे पती स्पेशल काळे हे बाहेर येऊन शिवीगाळ करायला लागले. यावेळी त्यांनी चार आरोपींना तिथून पळून जाताना पाहिले. आरोपी विक्रम व आकाश हातात तलवार आणि कोयता घेऊन फिर्यादीच्या पतीच्या अंगावर धावून गेले. आरोपी विक्रमने हातातील कोयता तिफाना यांच्या डोक्‍यात मारला. त्यानंतर फिर्यादी यांची मुले या भांडणाचा आवाज ऐकून बाहेर आले. आरोपींना यांच्यावर देखील वार करत त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

Love Affair Tragic End : प्रेमाचा धक्कादायक शेवट! अल्पवयीन मुलीसह तरुणाने राधानगरी जंगलात जीवन संपवलं, एकाच झाडाला गळफास; दोन दिवसांनी मृतदेह हाती

तिला लाजच नाही... 'आई माझी काळूबाई'च्या सेटवर अलका कुबल- प्राजक्तामध्ये झालेला मोठा वाद; नेमकं काय घडलेलं?

Road Accident : अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह चार भाविकांचा दुर्दैवी अंत, सात जण जखमी

SCROLL FOR NEXT