पिंपरी-चिंचवड

Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो, लॉकडाउनचे हे नविन आदेश जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आज मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित आदेश काढला. त्यानुसार पेट्रोल व गॅस पंपांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा राहील. मात्र, केवळ सरकारी वाहने, अत्यावश्‍यक सेवा आणि पुरवठा साखळीतील वाहनांनाच इंधन मिळणार आहे. तसेच, कंपन्या सुरू राहणार असून कामगारांना स्वतःच्या वाहनाने ये-जा करता येणार आहे. त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पास देऊन त्याची माहिती पोलिस ठाण्यांना द्यायची आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. 

पुणे शहर व जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात आज मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाउन राहणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी रविवारी रात्री आदेश काढला होता. त्यातील काही अटी व शर्ती बदलून आज दुपारी नवीन आदेश काढला. त्यानुसार, कामगारांना कामावर जाण्यासाठी कंपनीतील मनुष्यबळ विभागाकडून (एचआर) पत्र घ्यावे लागेल. तसेच, कंपनीचे ओळखपत्र जवळ बाळगावे लागेल. पोलिसांनी अडविल्यास पास व कंपनीचे ओळखपत्र दाखवायचे आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरू ठेवता येणार आहे. शक्‍य असल्यास त्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, आयटी कर्मचाऱ्यांसुद्धा कंपनीने दिलेला पास व ओळखपत्र जवळ ठेवावे लागणार आहे. पोलिसांनी अडविल्यास ते दाखवून पुढील प्रवास करावा लागणार आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगांनासुद्धा हाच नियम लागू आहे. 

लॉकडाउन कालावधीत कंपनीत कामावर असलेल्या कामगाराला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या उपचारासह अन्य कामगारांच्या तपासणीचा खर्च कंपनी व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. तसेच, संपूर्ण कंपनी व परिसराचे निर्जुंतकीकरणाची गरज आहे. 

महापालिकेने यापूर्वी दिलेले पास रद्द करण्यात आले आहेत. शहरांतर्गत सेवांकरीताचे पास epass.addl2@pcmcindia.gov.in या वेबसाईटवरून घेता येईल. आदेशाचे पालन न करण्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. 

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM योगी आदित्यनाथ यांना मातृशोक, आईचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन

Sant Namdev Maharaj Temple : सोलापूरच्या बाळीवेसमध्ये उभारलं जातंय 100 वर्षे जुन्या संत नामदेव महाराजांच्या मंदिराचं भव्य रूप! काळ्या पाषाणातील मेघडंबरी अन् 'ही' असतील खास वैशिष्ट्ये

मुलीच्या लग्नासाठी घेतले २५ हजारांचे कर्ज; सावकाराने हिरावली ४.५ एकर जमीन, ३० वर्षांनी महिलेला मिळाला न्याय!

Latest Marathi News Live Update : ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार समाधान आवताडे यांची भेट; पंढरपूर दौऱ्यापूर्वी झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

Prabhadevi: मोठी बातमी! प्रभादेवीतील १०१ बांधकामांवर रेल्वेची तोडक कारवाई; स्थानिकांचा विरोध, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT