पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड परिसरात गांजा तस्करीचं सत्र सुरूच; हिंजवडी, चाकणनंतर भोसरीत कारवाई

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भोसरी येथून एकाला अटक केली. त्याच्याकडून साडेनऊ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 

दत्ता पुरूषोत्तम कल्याणी (वय 25, रा. शिवशक्ती कॉलनी नं. 1, लांडेवाडी, भोसरी, मूळ-लातूर) असे आरोपीचे नाव आहे. कल्याणी याच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी (ता. 10) सकाळी पावणे बाराच्या सुमारास पोलिसांनी लांडगे वस्ती परिसरात सापळा रचला. येथील शिवशक्ती कॉलनी नंबर एक व दोनच्या पुढील मोकळ्या मैदानातील रस्त्यालगतच्या झाडीतून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दोन पोत्यांची तपासणी केली असता त्याच्याकडे नऊ लाख 37 हजार 500 रुपये किमतीचा 37 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा व 210 रूपयांची रोकड सापडली. हा माल जप्त करून आरोपीवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वीच हिंजवडीत साडेसहा लाखांचा गांजा जप्त करण्यात आला, चार दिवसांपूर्वी चाकण जवळील शेलपिंपळगाव येथे तब्बल वीस कोटींचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. यावरून शहर व परिसरात मोठ्याप्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार मार्च-एप्रिलचा हप्ता? महत्त्वाची अपडेट समोर...

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

Assembly election results 2026 Live Update : ममतांच्या गडात नेमकं काय घडलं? शांतपणे काम करणाऱ्या ५ चेहऱ्यांनी बंगालचं राजकारणच बदललं

Baramati election result : बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी; अजित पवारांचा २०१९ चा रेकॉर्ड मोडला

Horror Feeling Reason : काही घरांमध्ये किंवा विशेष ठिकाणी भीती का वाटते? हे भूत नाही, विज्ञानाने स्पष्ट केलं खरं कारण

SCROLL FOR NEXT