toll sakal
पिंपरी-चिंचवड

पुणे - नाशिक महामार्गावर नो बॅरिकेड.. नो टोल..

वाहनचालकांनाही वाहतूक कोंडी व टोल पासून दिलासा मिळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोशी : पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या मोशी उपनगरातील टोल नाका शनिवारी (ता. 9) बंद झाला. या प्रकल्पाची मुदत शुक्रवारी (ता. 8) संपली आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील या टोलनाक्यावर ना बॅरिकेट.. ना टोल वसूली... त्यामुळे येथे थांबावे न लागल्याने वाहन सुसाट झाली आहेत.तसेच वाहनचालकांनाही वाहतूक कोंडी व टोल पासून दिलासा मिळला आहे.

मोशीतील टोलनाक्यावर नाशिक, संगमनेर, आळेफाटा, खेड, जुन्नर, आंबेगाव आदी भागाकडून पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहराकडे ये-जा करणारी शेकडो वाहने या टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबत असत. त्यातच पिंपरी चिंचवड व चाकण आदी औद्योगिक वसाहतीकडेही ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांचीही या ठिकाणी मोठी वर्दळ होती. या टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबावे लागत असल्यामुळे येथील वाहनचालकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.

शुक्रवारी आयआरबी कंपनीने आपली टोल वसुलीची मुदत संपल्याने टोलनाक्यावर आयआरबी कंपनीने टोल नाका बंद केल्याविषयी संबंधीत सूचना फलक लावला असून आता टोलनाक्यावर कर्मचारीही नाहीत, टोलही नाही व वाहतूक कोंडी ही नाही. त्यामुळे आता वाहन चालक येथून आपली वाहने सुसाट हाकत आहेत.

आठवड्यातून दोन ते तीन वेळा आळेफाटा याठिकाणी गावी ये-जा करावी लागते. या ठिकाणी टोल भरायला थांबल्यावर दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक कोंडी मध्ये थांबावे लागत होते मात्र आता हा टोल नाका बंद झाल्याने आम्हा वाहनचालकांचा वेळ, पैसा व इंधन वाचणार आहे.

राहुल आवटी, उद्योजक, भोसरी

लखीमपूरमधील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुरु असलेल्या बंदचा मोशी मध्ये काहीही परिणाम जाणवला नाही. कारण पुणे नाशिक महामार्गाने नेहमीचीच वाहतुक सुरु होती तर दुकानेही उघडीच होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT