पिंपरी-चिंचवड

पिंपरी : पोलिसांना आता 'ही' दुहेरी कसरत करावी लागणार...

मंगेश पांडे

पिंपरी : लॉकडाउनमुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याने पोलिसांना पूर्णवेळ नाकाबंदी, बंदोबस्त यासाठी देता आला. मात्र, आता पुन्हा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागल्याने बंदोबस्तासह गुन्ह्यांच्या तपासाचेही कामकाज करावे लागणार आहे. पोलिसांना आता दुहेरी कसरत करावी लागत आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र 25 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला. या कालावधीत पोलिसांनी शहरातील मुख्य चौकासह रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना चौकशी केली जात होती, अशा काळात गुन्हेगारही बाहेर पडले नाहीत. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या संसर्गाची भीती तर दुसरीकडे पोलिसांचा धाक असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण घटले होते. मात्र, आता लॉकडाउन शिथिल करण्यासह दारूच्या दुकानांना परवानगी दिल्याने पुन्हा गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसांत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत खुनाच्या पाच घटना घडल्या. यासह खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, टोळक्‍याकडून हल्ला या घटनांमध्येही वाढ झाली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू होती, त्यावेळी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पंधरा पोलिस ठाणे मिळून अवघ्या दोन ते तीन गुन्ह्यांची नोंद होत होती. मात्र, हा आकडा आता पंधरा ते वीस गुन्ह्यांवर पोहोचला आहे. यामध्ये गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. 

एकीकडे गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांचे काम वाढले असताना दुसरीकडे मात्र नाकाबंदीसह विविध ठिकाणच्या बंदोबस्ताचीही जबाबदारी आहे. गुन्हा घडल्यानंतर फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करणे, घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींचा शोध, अटक करून न्यायालयात हजर करणे या कामांसाठी पोलिसांचा खूप वेळ जातो. यामध्ये अधिकारी, कर्मचारी अडकल्यानंतर इतर ठिकाणी मनुष्यबळ पुरविणे शक्‍य होत नाही. दरम्यान, लॉकडाउन कालावधीत गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याने नाकाबंदीसह इतर ठिकाणच्या बंदोबस्तासाठी पूर्णवेळ देणे शक्‍य होत होते. आता मात्र, यामध्ये पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून त्यांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अपुरे मनुष्यबळ 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या तीस लाख लोकसंख्येमागे केवळ तीन हजार पोलिस आहेत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. कमी मनुष्यबळातच अधिकाऱ्यांना कामकाज करावे लागत आहे. पोलिसांना कसरत करावी लागत आहे. 

कोरोनाची भिती 

कोरोनाची लागण झालेल्या आयुक्तालयातील पोलिसांचा आकडा सातवर पोहोचला आहे. यामुळे पोलिस दलातही भितीचे वातावरण पसरले आहे. ड्युटीवर अहोरात्र राबत असताना कोरोनाची भितीही मनात आहे.

पंधरा दिवसांत पाच खून 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 24 मार्च ते 9 मे दरम्यान खुनाची एकही घटना घडली नाही. लॉकडाउन शिथिल करून दारूच्या दुकानांना सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. त्याचप्रमाणे खुनाच्या घटनाही वाढल्या. मागील पंधरा दिवसांत तब्बल पाच खून झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT