the number of corona patients decreased by sixty percent In Pimpri-Chinchwad  
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात 80 हजारांचा आकडा पार; पण, रुग्ण संख्या साठ टक्क्यांनी घटली

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत 80 हजार 220 वर पोचली आहे. तर, 73 हजार 911 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या चार हजार 973 रुग्ण सक्रिय आहेत. यात सहा हजार 62 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या फक्त 912 आहे. मात्र, त्यातील 693 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. 133 जण गंभीर असून 86 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत 13 जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. मात्र, बरे झालेल्या 259 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एक हजार 351 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांमध्ये 49 हजार 946 पुरुष, 30 हजार 269 महिला व नऊ तृतीय पंथियांचा समावेश आहे. 

आजपर्यंत बारा वर्षांखालील सहा हजार 146 मुलांना संसर्ग झाला आहे. 13 ते 21 वयोगटातील सहा हजार 586 युवक, 22 ते 39 वयोगटातील 30 हजार 344 तरुण, 40 ते 59 वयोगटातील 24 हजार 488 प्रौढ आणि साठ वर्षांवरील 10 हजार 620 ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झालेला आहे. 

तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा

पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाख 79 हजार 293 जणांचे अठ्ठावीस दिवसांचे होम क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. सध्या 17 हजार 606 जण होम क्वारंटाइन आहेत.

सर्वेक्षणात 399 पाॅझिटीव्ह
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत गेल्या पंधरा दिवसांत एक हजार 314 पथकांद्वारे शहरात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. आजपर्यंत 20 लाख 65 हजार 381 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एक हजार 733 नागरिकांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 399 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. 

सर्वेक्षण दहा आॅक्टोबरपर्यंत चालणार
सर्वेक्षणाचा पहिला टप्पा दहा ऑक्टोबर रोजी पूर्ण होणार आहे. 14 आॅक्टोबर ते 25 आॅक्टोबर या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा होईल. या कालावधीत घरी आलेल्या स्वयंसेवकांना खरी माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT