corona.jpg 
पिंपरी-चिंचवड

Big Breaking : पिंपरीकरांनो धोक्याची घंटा; काय झाले दिवसभरात वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात बुधवारपर्यंत दाखल कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या दोनशेवर पोचली आहे. यात शहरातील 179 आणि पुण्यातील 22 अशा 201 रुग्णांचा समावेश आहे. आज पाच जण पॉझिटिव्ह आढळले असून चौदा दिवस उपचार घेऊन बरे झालेल्या पाच जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यात शहरातील रहिवाशांसह शहराबाहेरील रुग्णांचाही समावेश आहे. शहरात 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. आज ही संख्या दोनशेपर्यंत पोचली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिवाय, शहरातील रहिवासी मात्र पुण्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या 11 आहे. त्यातील तीन जण आजपर्यंत बरे झाले आहेत. सध्या शहरातील 179 पैकी 116 जण बरे होऊन घरी गेले असून 59 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच, पुण्यातील रहिवासी मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेणाऱ्या 22 पैकी सात जण बरे होऊन घरी गेलेले आहेत. सध्या दहा जणांवर उपचार सुरू असून आजपर्यंत पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.

औंध रुग्णालयात एकूण 43 
सांगवीतील औंध जिल्हा रुग्णालयात सध्या 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे आजपर्यंत 43 रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातील तीन जणांचा मृत्यू झालेला असून 28 जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या चार रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT