पिंपरी : लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून बंद असणाऱ्या बांधकामांच्या ऑनलाइन परवानगीस सोमवारपासून (ता. १८) सुरुवात होणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी (ता. १६) सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांसमोरील अडचणी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र सावंत, उपाध्यक्ष नंदू घाटे यांनी सहभाग घेतला. आतापर्यंत एक लाख आठ हजार मजुरांनी गावी जाण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५ हजार लोक गेले आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये एक लाख लोक जाणार आहेत. त्यामुळे अशा मजुरांना थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी या वेळी सांगितले. बांधकाम, उद्योगांना कर्मचारी, मजूर कसे उपलब्ध होतील, यासाठी उपाययोजना कराव्या लागतील.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
झोपडपट्टीचा विकास करा
शहरातील झोपडपट्ट्या दत्तक घेऊन सामाजिक दायित्व म्हणून विकसित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. बांधकाम व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांच्या निवाऱ्यासाठी चांगली घरे उभारण्याची गरज आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी शिथिलता दिली असली तरी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कामावर येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे दिवसातून तीन वेळा तापमान घेणे, हॅन्डवॉश आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर करणे, मास्कचा वापर, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टस्निंग पाळणे, साईटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती ठेवणे, आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे, अशा सूचना हर्डीकर यांनी या वेळी केल्या.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नियम पाळाच
एखाद्या बांधकाम प्रकल्पावर कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर पोलिसांनी संबधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करू नये, अशी सूचना या वेळी उपस्थित करण्यात आली. याला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेत सर्व सूचनांचे पालन करायला हवे. पहिले चार दिवस करायचे आणि नंतर त्यामध्ये खंड पाडायचा असे होता कामा नये. आपल्याकडे कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी प्रत्येकाने घेत नियमांचे पालन करायला हवे. काही ठिकाणी वेळेची बंधने घातली आहेत, त्याचे पालन होणे आवश्यक आहे. शंकर जगताप यांनी प्रास्तविक आणि सूत्रसंचालन केले. बाळासाहेब करंजुले यांनी आभार मानले.
स्थानिकांना प्रशिक्षण द्या
परप्रांतीय मजूर गावी गेल्यामुळे स्थानिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना काम देता येऊ शकते, असा प्रश्न आर्किटेक्ट प्रसाद पवार यांनी विचारला. त्यावर ही योजना चांगली असून त्यावर त्यावर काय करता येईल, याचा विचार करणार असल्याचे जिल्हाधिकारी राम म्हणाले. बांधकाम सुरू करताना आमच्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्याची नोंदणी महापालिकेकडे केली होती. मात्र, आता त्यातले दहाजण गावी निघून गेले आहेत, तर पुन्हा परवानगी घ्यावी लागेल का, असा सवाल बांधकाम व्यावसायिक अमित गव्हाणे यांनी विचारला त्यावर त्यासंदर्भातील पत्र तुम्ही बांधकाम परवाना विभागाकडे देण्याची सूचना हर्डीकर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.