pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

सोसायटीची भिंत फोडून वाचविला पेपर टाकणाऱ्या मुलाचा जीव

पिंपरीतील साईनगर अपार्टमेंटमधील घटना

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरीतील (pimpri) साईनगर अपार्टमेंटमधील लिफ्टमध्ये वृत्त्तपत्र वितरक असलेला अल्पवयीन मुलगा अडकला होता. त्या मुलाची सोसायटीची भिंत फोडून सुखरूप सुटका करण्यात आलीय. सुमित आळसे असे वृत्त्तपत्र वितरक मुलाचे नाव आहे. वाचकां मधील देव माणसांची भेट झाल्याची भावना सुमितने व्यक्त केली.

तो साईनगरमध्ये शुक्रवारी (ता.१३) सकाळी वर्तमानपत्र टाकत जात होता. दोन इमारतीमध्ये वर्तमानपत्र टाकल्यानंतर तिसऱ्या इमारतीच्या लिफ्टमध्ये जाऊन तो सातव्या मजल्यावर पोहोचला. परंतु, लिफ्टमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे सातव्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली. अचानक लिफ्ट बंद झाल्याने तो घाबरला. नंतर त्याने प्रसगांवधान दाखवत अलार्म बटन दाबले आणि वर्तमानपत्र विक्रेते हेमंत तांबे यांना फोन केला. तांबे यांनी तात्काळ सोसायटीचे चेअरमन निलेश गिते यांना फोन केला.

गिते यांनी सुरक्षारक्षक आणि लिफ्टच्या देखभाल करणाऱ्या कंपनीला फोन केला आणि अभियंत्याला बोलवले. त्यानंतर सुमितला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र, बाहेर काढता येईना. अखेर ब्रेकरने भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तात्काळ भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्यात आले. सर्वांच्या प्रयत्नातून मला जीवदान मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली. सचिव विजय सोनवणे, अविनाश पऱ्हाड , पंकज खटावकर यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये पुन्हा बिबट्या दिसला

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

SCROLL FOR NEXT