Peoples Representatives are using corona infection as publicity event in Pimpari Chinchwad
Peoples Representatives are using corona infection as publicity event in Pimpari Chinchwad 
पिंपरी-चिंचवड

होय, मला कोरोना झालाय. तुमच्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच बरा होईल!

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोना व्हायरस, कोवीड-19. नाव घेतलं तरी अनेकांच्या मनात भिती आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने जनता कर्फ्यू पाळला, लाॅकडाउन केले. रुग्ण आढळलेले भाग सील केले. कंटेन्मेंट अर्थात प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. मास्क वापरणे सक्तीचे केले. थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. वारंवार हात धुवा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टंसिंग पाळा, असे प्रशासन जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगत आहेत. पण, काही जणांवर फरक पडलेला दिसत नाही. काय होतंय? म्हणत बिनधास्त फिरत आहेत.
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकदा संसर्ग झाल्यावर साधारणतः पंधरा दिवस सुटका नाही, अनेक जण दगावले आहेत. त्यात बालक आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ आहेत. गरीब आहेत, तसे मल्टिस्पेशालिटी खाजगी रुग्णालयांत उपचार घेतलेले श्रीमंत आहेत. इतका गंभीर आजार असूनही काही लोकप्रतिनिधी मात्र त्याचा म्हणजे कोरोना संसर्ग झाल्याचा इव्हेंट करीत असल्याचे चित्र आहे. 'होय, मला कोरोना झालाय. तुमच्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच बरा होईल,' अशा स्वरुपाचा संदेश सोशल मीडियावरून स्वत: व्हायरल केला जातोय. विशेषतः आपापल्या भागातील नागरिकांपर्यंत अर्थात मतदारांपर्यंत तो नियोजनबद्धपणे पोचविला जात आहे. एक झाले, दोन झाले, तीन झाले आता अनेक जण अशा पद्धतीने वागत आहेत. त्यामुळे हा सर्व खटाटोप प्रसिद्धीसाठीच केला जात असल्याची चर्चा आता नागरिकांमध्येच होऊ लागली आहे. 

पुणे : महापालिकेचे पदाधिकारी पॉझिटिव्ह तर, दोन खासदार, चार आमदार होम क्वारंटाईन

जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचे नाव, पत्ता जाहीर करू नये, असे संकेत आहेत. कारण, संसर्ग होणे, हा काही गुन्हा नाही. त्या रुग्णाने मुद्दामहून कृत्य केलेले नाही. त्याला तो संसर्ग कोणाच्या तरी संपर्कातून झालेला आहे. त्यामुळे अशा रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबाला सन्मानाची वागणूक द्या, असे आवाहन सरकार वेळोवेळी करीत आहे. मात्र, काही लोकांच्या मनात भिती कायम आहे. काही संवेदनशील मनाचे लोक हळहळही व्यक्त करतात. कुटुंबाविषयी सहानुभूती निर्माण होते. यापूर्वी संसर्गावर यशस्वी मात करून घरी आलेल्या रुग्णांचे विजयी विराप्रमाणे स्वागतही केले आहे. त्यांच्याविषयी समाजात आपुलकी, आदर, सहानुभूती निर्माण झाली आहे. नेमका, याचाच फायदा काही जण उचलताना दिसत आहेत. यात काही राजकीय पदाधिकारी आघाडीवर आहेत. काहींनी तर त्याचा इव्हेंटच केला आहे.

पुण्यातला त्रिशुंड गणपती तुम्हाला माहिती आहे का? पाहा व्हिडिओ!

पिंपरी-चिंचवड शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधींना कोरोना संसर्ग झाला आहे. यात पिंपरी विधानसभा मतदारसंघातील एक माजी नगरसेविका, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक माजी नगरसेवक, एक विद्यमान नगरसेविका आहेत. हे आता बरे होऊन घरी गेले आहेत. एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा जणांना संसर्ग झाला होता. तेही बरे झाले आहेत. मात्र, माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यांना कधी संसर्ग झाला, ते कधी रुग्णालयात दाखल झाले. याचा थांगपत्ताही लवकर कुणाला लागला नाही.

पुणेकरांनो, आता तरी नियम पाळा; 16 दिवसांमध्ये 10 हजार जण कोरोनाबाधित! 

गेल्या दोन दिवसांत तीन नगरसेवकांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले आहेत. त्यांनी स्वत:च माध्यमांना माहिती दिली आहे. सोशल मीडियावर स्वत:च्या छायाचित्रासह पोस्ट व्हायरल केली आहे. इतका गंभीर आजार असताना प्रसिद्धीसाठी त्याचंही भांडवल केलं जात असल्याचे यावरून दिसून येते. जनतेची विशेषतः मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार नाही का? अशी चर्चा आता नागरिकांमध्येच रंगू लागली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT