pimpari congress
pimpari congress 
पिंपरी-चिंचवड

काँग्रेस इच्छुकांना शहराध्यक्षपदाचे वेध

सकाळ ऑनलाईन टीम

पिंपरी: राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी नुकत्याच मुलाखती घेण्यात आल्या. त्याला पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही निर्णय झालेला नाही. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कार्यक्षम नेतृत्वाचा शोध संपणार केव्हा? अशी चर्चा आता पक्षातच सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलल्यामुळे कॉंग्रेसला "अच्छे दिन' आले आहेत. मात्र शहरस्तरावर कॉग्रेसची स्थिती बिकटच आहे. शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रतिकूल परिस्थितीत साडेसहा वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांचे संघटन केले. परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला. तो मंजूर केल्यामुळे रिक्तपदासाठी 24 नोव्हेंबरला प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आणि नाशिक शहर अध्यक्ष व पिंपरी-चिंचवडचे पक्ष निरीक्षक शरद आहेर यांनी 16 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्याला कधी नव्हे ती आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

कदम, नेवाळे आणि पांढारकर यांच्यात चुरस
अनेक वर्ष पक्षातून गायब असलेल्या माजी नगरसेवकांनी मुलाखतीसाठी आवर्जून हजेरी लावली होती. दुसरीकडे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक मोरे, मनोज कांबळे, तुकाराम भोंडवे यांनी मुलाखत दिली असली, तरी त्यांची वर्णी लागण्याची शक्‍यता कमी असल्याची चर्चा आहे. इतर इच्छुकांमधील माजी नगरसेवक व इंटकचे जिल्हाध्यक्ष कैलास कदम, माजी शिक्षण मंडळाचे उपसभापती व टेल्को कंपनीचे माजी कामगार नेते विष्णूपंत नेवाळे आणि पिंपरी चिंचवड कॉंग्रेस समितीचे उपाध्यक्ष दिलीप पांढारकर यांच्या खरी चुरस असेल.

अध्यक्षांकडे इच्छुकांची "फिल्डींग'
प्रत्येकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. तर अन्य कार्यकर्ते नव्या अध्यक्षांच्या प्रतीक्षेत आहेत. आता साठे यांचे विरोधक इच्छुक असल्याने सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अध्यक्ष नेमके कोणाच्या नावाला पसंती दर्शवितात. याकडे आता सगळ्याचे लक्ष लागले आहे. प्रक्रिया सुरू असून पक्षश्रेष्ठीच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या एकही नगरसेवक नाही
पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी या पाच गावांची मिळून 1972 मध्ये नगरपालिका अस्तित्वात आली. त्यापूर्वी सर्व गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती होत्या. त्या काळापासून नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत होईपर्यंत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना होईपर्यंत म्हणजेच 1998 पर्यंत महापालिकेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, गेल्या वीस वर्षात कॉंग्रेस महापालिकेपासून दूर गेली. फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत तर पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही.

तातडीने निर्णय घेण्याची गरज
पक्षाने नवीन व्यक्तीला शहराध्यक्षपदाची संधी दिल्यास शहरातील वॉर्डाचा, प्रभागांची माहिती घेऊन तेथे पक्षाची ताकद कशी आहे, याचा अभ्यास करून पक्षवाढीसाठी नक्की काय करायचे, यासाठी संबंधित व्यक्तीला वेळ मिळणार आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन पक्षाने शहराध्यक्ष जाहीर करण्याची गरज असल्याचा दावा केला जात आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT