Food-for-Corona-Patient
Food-for-Corona-Patient 
पिंपरी-चिंचवड

घरून आणू देईना; इथे पोटभर मिळेना; पिंपरीत रुग्णांची व्यथा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘घरून जेवण आणू देत नाहीत, इथे पोटभर मिळत नाही. आम्हाला किमान पोटभर जेवण तरी द्या, नाहीतर आम्ही वाचणार कसे?,’ हे रडवेले शब्द आहेत महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांचे. महापालिका रुग्णांच्या जेवणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असली, तरी अन्न पुरवठादराकडून मात्र अपुरे व अवेळी जेवण मिळत आहे. रुग्णांवर अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णांना चहा, नाश्‍ता, जेवणाची सुविधा आहे. ठेकेदाराला त्याबाबतच्या वेळा व अन्नपदार्थांचे प्रकार व वजन निश्‍चित करून दिले आहे. त्याचे दर ठरवून दिले आहेत. प्रत्यक्षात जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. पोटभर अन्न मिळत नाही. रुग्णांसह निवासी डॉक्‍टरांनाही अर्धपोटी राहावे लागत आहे. ही परिस्थिती गेल्या आठ दिवसांपासून अर्थात ठेकेदार बदलल्यापासून निर्माण झाली आहे. यापूर्वी महापालिकेने अन्न पुरवठादारांना एका रुग्णासाठी दररोज १०० रुपये, ४८० रुपये, १५० रुपये, २५० रुपये प्रमाणे जेवणाचा खर्च दिलेला आहे. वायसीएममध्ये अन्न पुरविणाऱ्या पूर्वीच्या ठेकेदाराला १५० प्रतिरुग्ण खर्च दिला जात होता. त्याच्याबाबत तक्रारी आल्याने निविदा प्रक्रिया राबवली व पिंपळे गुरव येथील सावित्रीबाई महिला स्वयंरोजगार संस्थेला ठेका देण्यात आला. त्यानुसार प्रतिरुग्ण दररोज १८० रुपये दिले जात आहेत.

आदेशानुसार काहीच नाही
सकाळी साडेआठला नाश्‍ता, दुपारी एक व रात्री साडेआठला जेवण, सकाळी साडेआठ व दुपारी चार वाजता चहा द्यावा, असे महापालिकेने आदेशात नमूद केले आहे. पदार्थांचे वजनही ठरवून दिले आहे. प्रत्यक्षात सकाळचा चहा दहाला, दुपारचे जेवण साडेतीन व रात्रीचे साडेदहा वाजता मिळते. दुपारचा चहाही वेळेत मिळत नाही. मधुमेह रुग्णांनासुद्धा साखरेचा चहा दिला जातो. अन्नपदार्थही अपूर्ण दिले जात आहे. त्यामुळे अर्धपोटी राहावे लागत असल्याची व्यथा रुग्णांनी ‘सकाळ’कडे मांडली. आता नाश्‍त्यासाठी अवघे ४० ग्रॅम पोहे, दुपारी जेवणात केवळ पातळ दोन चपात्या व वरण-भात असतो, असेही त्यांनी नमूद केले. अन्नाअभावी रुग्णांची हेळसांड होत असून, निकृष्ट जेवणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती नातेवाइकांनी व्यक्त केली. 

रुग्णांच्या जेवणासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. नव्या निविदाधारकाला काम दिले आहे. संबंधितांनी जेवण देण्यासही सुरुवात केली आहे. प्रत्येकाचा आहाराचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यानुसार भोजन व्यवस्था केलेली आहे. अतिरिक्त आहार त्यांना देऊ शकतो.
- मंगेश चितळे, सहायक आयुक्त भांडार विभाग 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT