Teacher esakal
पिंपरी-चिंचवड

Teacher Recruitment : महापालिकेच्या शिक्षक भरतीसाठी गर्दी; शाळांमध्ये भरणार २०९ जागा

पिंपरी महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांत २०९ शिक्षकांची संख्या कमी आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांत २०९ शिक्षकांची संख्या कमी आहे. परिणामी, शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदरच तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर बीएस्सी, बीएड, बीए बीएड, बी. पी. एड. उत्तीर्ण परीक्षेतील सहायक शिक्षकांची भरती सुरू केली आहे. यासाठी गुरुवारी (ता. १) अर्ज मागविण्यात आले होते. २०९ जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्जदारांनी गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत.

संत तुकारामनगरमधील दिनदयाळ माध्यमिक विद्यालयात सकाळी नऊ वाजता अर्जदार दाखल झाले होते. निवड होणाऱ्या शिक्षकांना २७ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वीकारण्यात आली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या मराठी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण २९ शाळा आहेत. या शाळांमध्ये ९ हजार ८९३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी १२९ शिक्षक आहेत. मात्र, सध्या २०९ रिक्त जागा आहेत. शाळांमध्ये तब्बल २०९ शिक्षक संख्या कमी आहे. या शिक्षकांची संख्या कमी असल्याचे शिक्षण विभागाला माहिती असल्याने शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदरच त्वरित मानधनावर सहायक शिक्षकांची भरती करण्यासाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली.

माध्यमिक शिक्षण विभागामार्फत तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी बी. एस्सी, बीएड, बीए बीएड, बी. पी. एड. उत्तीर्ण परीक्षेतील शिक्षकांच्या नेमणुका गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. उर्दू माध्यमाच्या सहायक शिक्षकांना महापालिकेच्या कोणत्याही उर्दू विद्यालयात कामकाज करावे लागेल. तसेच बी. ए. बी.एड. उर्दू शिक्षकांना सर्व विषयाचे अध्यापनाचे काम करावे लागेल, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केल्या.

मराठी माध्यमांमध्ये जवळजवळ १८४ पदे भरली जाणार आहेत आणि ही १८४ पदे एकत्रित मानधनावर भरली जाणार आहेत. तसेच उर्दू माध्यमांच्या २५ जागा भरण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना २७, ५००रुपये प्रति महिना एकत्रित मानधन दिले जाणार आहे.

मराठी माध्यम (बी.एस्सी. बी.एड.)

माध्यमिक शिक्षक जागा

बी.एस्सी. बी.एड. (विज्ञान) ३३

बी.एस्सी. बी.एड. (गणित) ३०

बी.ए. बी.एड. (मराठी) ३२

बी.ए. बी.एड. (हिंदी) २२

बी.ए. बी.एड. (इंग्रजी) २५

बी.ए. बी.एड. (इतिहास) १०

बी.ए. बी.एड. (भूगोल) १०

बी.पी.एड. (क्रीडा शिक्षक) २२

एकूण जागा १८४

उर्दू माध्यम

बी.एस्सी. बी.एड. (उर्दू) ९

बी.ए. बी.एड. (उर्दू - भूगोल) ७

बी.ए. बी.एड. (इंग्रजी - इतिहास) ९

एकूण पदे २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT