Cyclist Sakal
पिंपरी-चिंचवड

इंडिया सायकल फॉर चॅलेंज स्पर्धेत पिंपरी चिंचवडचा तिसरा क्रमांक

भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडिया सायकल फॉर चॅलेंज स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडिया सायकल फॉर चॅलेंज स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

पिंपरी - भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडिया सायकल फॉर चॅलेंज स्पर्धेत (India Cycel for Challenge Competition) पिंपरी चिंचवड शहराने (Pimpri Chinchwad City) तिसरा क्रमांक पटकाविला आहे. १ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत जास्तीत जास्त सायकलिंगद्वारे पिंपरी चिंचवड शहरात (7369 किमी) प्रवास करण्यात आला. तर पहिल्या पाच शहरांमध्ये, इंदौर (10065 किमी), अजमेर (7565 किमी), जबलपुर (4114 किमी), जयपूर (3680 किमी) या सहभागी शहरांनी सायकल प्रवास केला.

१ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत पार पडलेल्या स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप अभियंता सुनिल पवार, कार्यकारी अभ‍ियंता बापुसाहेब गायकवाड यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवून यश संपादित केले. तर, संदेश खडतरे यांनी नववा क्रमांक प्राप्त करून पिंपरी चिंचवड शहराच्या लौकिकात भर घातली आहे. तसेच, फ्रीडम 2 वॉक & चॅलेंज स्पर्धेत मुख्य माहिती व तंत्रज्ञान अध‍िकारी निळकंठ पोमण, सह शहर अभ‍ियंता सतिष इंगळे यांनी देखील सहभाग नोंदवून स्पर्धेत उत्तम कामगीरी बजावली आहे.

त्याचबरोबर, सायकलिंग, चालणे, जास्तीत जास्त किमी चालणे या स्पर्धेतही पिंपरी चिंचवड शहराने नंबर पटकाविला. या यशाबददल विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला.

पर्यावरण प्रदुषण टाळण्यासाठी तसेच नॉन मोटराईज ट्रान्स्पोर्टला प्रोत्साहन देण्याकरीता देशातील सर्व शहरांना सायकलिंग आण‍ि वॉकींगची सवय लागावी, या उददेशाने केंद्र सरकारच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये, देशातील १०० हून अधिक शहरांनी India Cycles4Change Challenge सहभाग नोंदविला होता. राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण (2006) चा दृष्टीकोन बाळगण्याकरीता शहरांना सायकलिंग सारख्या वाहतुकीच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात आले होते.

सायकलिंगसाठी अनुकूल शहरे, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणे, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुधारणे, नागरिकांमध्ये संवाद वाढणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतु होता. पिंपरी चिंचवड शहरात सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT