Shops closed in Kamshet Market on the first day of Janata Curfew 
पिंपरी-चिंचवड

कामशेत बाजरपेठेत जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद; पहिल्या दिवशी दुकाने बंद 

सकाळवृत्तसेवा

कामशेत : नेहमीच गजबजलेल्या कामशेतच्या बाजारपेठेत आज शुकशुकाट होता, नागरिकांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, कोरोना संसर्गची साखळी तोडण्यासाठी शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू केला, त्यात किराणा ,कापड व भाजीपाल्याची  दुकाने, हॉटेल्स बंद ठेवली होती, मात्र दवाखाने आणि औषधाची दुकाने दुपारपर्यंत सुरू होती. दवाखान्यात किंवा काही महत्वाच्या कामानिमित्त तुरळक नागरिक घराबाहेर पडले होते. शनिवारी ता.५ पासून गुरुवार ता.१० पर्यत हा कर्फ्यू असणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यातील नऊ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरभर भीतीचे वातावरण पसरले आहे, कोरोना संसर्गची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू हा पर्याय पुढे आल्याने शहरातील व्यापारी, नागरिक, सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांची बैठक झाली आणि कोरोनावर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्णय झाला, शहरातील सहा दिवसाच्या जनता कर्फ्यूचे नियोजन झाले, त्यानुसार विभाग निहाय समिती स्थापन करून नियोजन करण्यात आले. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

शहरात परिसरातील सत्तर गावातील नागरिक खरेदीसाठी येत आहे, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी चार दिवस अगोदरच जनता कर्फ्यू मुळे बाजारपेठ बंद राहील असे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी किराणा आणि भाजीपाल्याची खरेदी केली होती. आज जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेतील दुकाने बंद होती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, नाणे रोड, पवनानगर रस्त्यावर एकही भाजीपाला किंवा फळे विक्रेता भाजीपाला व फळे  विक्री करीत नव्हता. शहरातील सर्व दवाखाने आणि औषधांची दुकाने दुपारपर्यंत सुरू होती. जनता कर्फ्यू तून कोरोनाच्या संसर्गची साखळी तुटायला मदत झाली तर प्रशासनाने देखील प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT