Nigdi Flyover Inauguration 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : निगडी उड्डाणपुलाचे उद्‌घाटनावरून राजकारण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उद्‌घाटनावरून राजकारण रंगले आहे. या पुलाचे सत्ताधारी भाजपच्यावतीने महापौर माई ढोरे यांच्या हस्ते उद्या (ता.10) उद्‌घाटन होणार आहे. त्याआधीच शहर राष्ट्रवादीने शहराध्यक्षांच्या हस्ते आज (ता.9) उड्डाणपुलाचे उद्घाटन करून सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिली आहे. श्रेय लाटण्यासाठी रंगलेल्या उद्‌घाटन नाट्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या दोन वर्षापासून महापालिकेच्यावतीने निगडीतील भक्ती शक्ती चौकात उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांना दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. उड्डाणपूल सुरू करण्याबाबत अनेकांनी महापौरांना निवेदन दिले होते. आता उड्डाणपुलावरील पुणे-मुंबई महामार्गाचे दोन्ही बाजूंच्या लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता वळसा घालण्याची गरज राहणार नसून पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन गुरुवारी (ता.10) सकाळी दहा वाजता झाल्यानंतर दोन्ही बाजूंची थेट वाहतूक लगेचच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.

दरम्यान, स्थानिक नगरसेवक मिसाळ यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्‌घाटन उरकून आज उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'शहराचा विकास राष्ट्रवादीच्या काळात झाला आहे. त्यामुळे कोणीही श्रेय लाटू नये.' यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका सुमनताई पवळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT