In Pune A man along with a woman with corona died in Talegaon 
पिंपरी-चिंचवड

पुणे : तळेगावात कोरोनाबाधित महिलेसह एका पुरुषाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

तळेगाव स्टेशन(पुणे): तळेगावातील डाॅ.भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयातील कोविड हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या तळेगावातील पंचावन्न वर्षीय महिलेसह देहूरोड येथील बेचाळीस वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजीविक्रेता महिलेला लक्षणे जाणवत असल्याने गेल्या २५ जुनला दाखल करण्यात आले होते. २६ जुनला घेतलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला होता. २७ जुनला तिच्या मुलाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने या महीलेच्या दुसऱ्यांदा घेतलेल्या स्वॅबचा कोविड-१९ तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आला. श्वासोच्छ्वासाला त्रास होत असल्याने गेले सहा दिवस ती व्हेंन्टीलेटरवर होती. आज शनिवारी (ता.०४) सकाळी पावणे सातला या महिलेचा मृत्यू झाला.

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार...
 

कोरोनासदृष्य लक्षणे आढळल्याने देहूरोड परिसरातील एका ४२ वर्षीय पुरुषाला ३० जुनला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २ जुलैला त्याचा पहिला कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. मात्र, सदर रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील कंपनीच्या सहकाऱ्याचा कोविड चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला असल्यामुळे पुन्हा शुक्रवारी (ता.०३) दुसरा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. त्यापुर्वीच शुक्रवारी (ता.०३) रात्री साडेदहाला या रुग्णाचा मृत्यू झाला अशी माहीती तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डाॅ प्रवीण कानडे यांनी दिली.

'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्या आजपर्यंत ४१ झाली आहे. यापैकी १३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर २६ जणांवर उपचार चालू आहेत. तळेगाव नगरपरिषद हद्दीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT