li.jpg 
पिंपरी-चिंचवड

#RainUpdate : पुणे-मुंबई महामार्ग बंद; वाहतुकीवर परिणाम, काय झाले वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

लोणावळा : खंडाळ्यात डीसी हायस्कूल, झारा रिसाॅर्ट येथे पुणे-मुंबई महामार्गावर वादळी वाऱ्याने वीजेचे खांब, झाडे रस्त्यावर आडवी झाल्याने खंडाळ्याहून खोपोलीकडे जाणारा महामार्ग बंद झाला आहे. 

बुधवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यामूळे दाणादाण उडाली असून लोणावळ्यात महामार्गावर दिवसभरात पाच ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. बुधवारी सकाळी येथील कैलास पर्वत हाॅटेल, महाराजा हाॅटेल, अपोलो गॅरेज, प्रिछली हिल दर्गा, एचपी पेट्रोल पंपाजवळ महामार्गावर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले.

दरम्यान, आयआरबी कंपनी तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने महामार्गावर कोसळलेले वृक्ष बाजूला करत वाहतुक सुरळीत केली. हे संकट कुठे दूर होते तोच खंडाळ्यातील झारा रिसाॅर्टजवळ महामार्गालगत असलेले विजेचे दोन ते तीन खांब आडवे झाले. 

तसेच रस्त्याच्या मधोमध खांब आडवे झाल्याने खंडाळ्यातून मुंबईच्या दिशेने खोपोलीकडे जाणारी व लोणावळ्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. महावितरणच्या वतीने विज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

घटनेची माहीती कळताच महावितरण व  लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात येत असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.  सुदैवाने महामार्गावर वाहनांची फारशी वर्दळ नसल्याने वाहतुकीवर  परिणाम झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT