chandrakant patil
chandrakant patil sakal
पिंपरी-चिंचवड

जुन्या आराखड्यानुसारच रिंगरोड करा : पाटील

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकऱ्यांना देशोधडीला लावून केलेला विकास आम्हाला अमान्य आहे. अनेक बड्या लोकांचे फार्महाऊस वाचविण्यासाठी नव्याने रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. नवीन आखणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित होत आहे. जुन्या आराखड्यानुसारच रिंगरोड करा, अशी मागणी करीत ‘तुम्ही जर तसे करणार नसाल, तर आमचा कडवा विरोध असेल,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रिंगरोडला मंगळवारी विरोध केला. (PCMC News)

रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना घेऊन पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला आमदार भीमराव तापकीर, शहर भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, कुसगाव, रहाटवडे, मांडी, बहुली, मुठा, सांगरूण, कातवडी, वरदाडे, खामगाव मावळ, शिवगंगा खोऱ्यातील खोपी, कांजले, केलवडे व भोर या गावांमधील अल्पभूधारक शेतकरी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रिंगरोडचा जो आराखडा तयार केला होता, त्यात शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होत नव्हता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने काही जणांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे. अशाप्रकारे जर विकासकामे राबवली जाणार असतील; तर ते आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे प्रस्तावित आराखडा रद्द करावा.

महाविकास आघाडीचे सरकार ‘हम करे सो कायदा’ या भूमिकेत वागत आहे. त्यामुळे सातत्याने विकासाभिमुख प्रकल्प तयार करण्याऐवजी, काही जणांचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत आहे. राज्य सरकारच्या या धोरणामुळे जनता देखील त्रस्त आहे. आगामी काळात जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल.

- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT