book.jpg 
पिंपरी-चिंचवड

बालभारतीने घेतला मोठा निर्णय; काय ते वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरु होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत शाळांना पुस्तकांचा पुरवठा केव्हा करणार? या आदेशाची प्रतीक्षा ‘बालभारती’ला लागून होती. मात्र आता वितरणाचा मार्ग मोकळा झाल्याने महापालिकेच्या केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे तब्बल एक लाख 39 हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत.  

लॉकडाउनला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे. परंतु, शाळा, महाविद्यालये सुरु होण्यास अजून महिना, दोन महिने अवधी लागणार असल्याचे दिसते. तरीही  दरवर्षीप्रमाणे यंदाही समग्र शिक्षा अभियानांतर्गत महापालिका व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य अभ्यासमंडळाची पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत.

दरम्यान, त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात मनपा शाळा 105, खाजगी अनुदानित 135, अश: अनुदानित 21, मनपा माध्यमिक 18 अशा एकूण 279 शाळांमध्ये 1 लाख 39 हजार 74 पुस्तके वितरीत केली जाणार आहेत. सध्या आकुर्डी उन्नत केंद्रासाठी कै.वसंतदादा पाटिल मनपा शाळा तर पिंपरी उन्नत केंद्रासाठी पिंपळे निलख मनपा शाळेत पुस्तके ठेवण्यात आली असून वाटपास सुरवात केली आहे. यंदा मराठी माध्यमासाठी पहिली ते सातवीसाठी 9 हजार 530 एकात्मिक पुस्तक भेट दिले आहेत. तर सेमीच्या वर्गासाठी 59 हजार 562 (गणित ) आणि 22 हजार 441 (सामान्यज्ञान ) अशी पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. 

दरम्यान,  प्रत्येक वर्षी साधारणत: मे महिन्यात वाटप सुरु होते आणि जूनमध्ये शाळा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचतात. पण यंदा कोरोनामुळे आता शाळा उशिरा उघडणार असल्याने पाठ्यपुस्तकेही पाठवण्यास उशिर होऊ नये, यासाठी शाळांनी पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांना वाटप करणे आवश्यक आहे. जेणेकरून मुले घरी अभ्यास करू शकतील,  अशी माहिती विषय तज्ज्ञ प्रदीप शिंदे यांनी दिली.

(इयत्ता पहिली ते आठवी )
माध्यम........पुस्तक संख्या 
-मराठी........ 87 हजार 465
-इंग्रजी......... 5 हजार o89
-उर्दू............. 4 हजार 21
-हिंदी........... 3 हजार 557

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT