ta.jpg
ta.jpg 
पिंपरी-चिंचवड

कात्रज बाह्यवळण महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले अन् तो टॅंकर... 

मुकुंद परंडवाल

देहू : देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे ब्रिजवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डांबर असलेला टॅंकर बुधवारी (ता.15) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पलटी झाला.

मुंबईहून सांगलीकडे हा टॅंकर भरधाव वेगाने जात होता. यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.टॅंकरमधील किन्नर गंभीर जखमी झाला.सोमाटणेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.बाह्यवळण मार्गाने पुण्याकडे येणारी द्रुतगतीमार्गावरील एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.

राहूल यादव (वय.19) असे जखमीचे नाव आहे. याबाबत टॅंकर चालक कलीमुद्दीन खान याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मुंबईतील कॅाटनग्रीन भागातून सुमारे 25 टन डांबर असलेला टॅंकर घेवून सांगलीकडे जात होतो.किवळे येथील तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याने टॅंकर पलटी झाला. टॅंकरमधील डांबर महामार्गावर पसरले.महामार्ग पोलिस,देवदूत पथक, आरबीआयचे सुरक्षा पथक,डेल्टा फोर्सचे पथक तातडीने घटनास्थळी पोचले. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT