Ten people including a former corporator have been booked for defrauding the bank of Rs 3 crore.jpg 
पिंपरी-चिंचवड

बँकेची पावणे 3 कोटींची फसवणूक; माजी नगरसेवकासह दहा जणांवर गुन्हा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बँकेची बनावट कागदपत्रे तयार करून दोन कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.

पूजाच्या हत्येचा कट? रूम भाड्याचा करार ते आत्महत्या; घटनाक्रमामुळे संशय

माजी नगरसेवक व बँकेचे अध्यक्ष विलास एकनाथ नांदगुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक देवेंद्र मोहन बारटक्के, रवींद्र सोनवणे, बँक अधिकारी गायत्री देशपांडे, बँक कशियर हेमलता नांदगुडे , स्मिता कदम, कर्जदार ज्ञानदेव बबन खेडकर, रामलिंग केदारी, तेजस जाधव, यशवंत जगन्नाथ पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी भगवान तुकाराम धोत्रे (वय 51 रा. मु. पो. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सोमवारी (ता. 15) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Petrol Price: पुण्यात पेट्रोलच्या शतकाला अवघ्या काही 'धावा' उरल्या

ही घटना 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या कालावधीमध्ये श्री छत्रपती अर्बन को ऑप बँक लिमिटेडच्या विशाल नगर, पिंपळे निलख येथील शाखेत घडली. आरोपींनी आपसात संगणमत करून खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या पिंपळे निलख येथील शाखेत दिली. या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी कर्ज आणि ठेवीत गैरव्यवहार करून खोटे हिशोब नोंदवले. यातून बँकेची दोन कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेचे सभासद ठेवीदार निबंधक यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पुणे विद्यापीठाचं ठरलं! परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन केलं जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

Crime News : गोव्यात उपचाराच्या नावाखाली परदेशी तरुणीवर अत्याचार, २८ वर्षीय डॉक्टरला सोलापुरातून अटक, ICU मध्ये असताना त्याने...

SCROLL FOR NEXT