पिंपरी : निगडीतील भक्तिशक्ती उड्डाणपुलाच्या वर्तुळमार्गावर सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार आहेत. दिशादर्शक व वेगमर्यादादर्शक फलक लावायचे आहेत. गतिरोधक उभारायचे आहेत. त्यासाठी वर्तुळाकार मार्ग व ग्रेडसेपरेटर बंद ठेवण्याची सूचना महापौरांनी (PCMC Mayer) केली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी पोलिसांना सांगितले आहे. वाहतूक कुठे वळवायची याची पाहणी पोलिसांनी केली आहे. बुधवारी (ता. ४) सकाळपासून पुलाचा वर्तुळमार्ग बंद ठेवण्याचे नियोजन आहे, असे महापालिका (pcmc) सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले. (The circle of 'devotional power' is closed)
पुणे-मुंबई महामार्गावर भक्तिशक्ती चौकात दुमजली उड्डाणपूल महापालिकेने उभारला आहे. त्याचा दुसरा मजला अर्थात पुणे-मुंबई दिशेने ये-जा करणारा मार्ग तीन महिन्यांपूर्वीच खुला केला आहे. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे प्राधिकरणातील स्पाइन रस्ता व निगडी-रावेज बीआरटी रस्ता जोडणारा मार्ग खुला केलेला नव्हता.
पुलाचा पहिला मजला चौकात वर्तुळाकार मार्ग आहे. तो पूर्ण होऊनही प्रशासन, सत्ताधारी भाजपकडून उद्घाटन केले जात नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने ३० जून रोजी पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र, पुलावर अपघात होऊ लागले. गेल्या महिनाभरात तीन जणांचा बळी गेला आहे. अपघातग्रस्त मार्गाची वस्तुस्थिती दर्शविणारी छायाचित्रे प्रकाशित करून ‘सकाळ’ने याकडे लक्ष वेधले होते.
दरम्यान, महापौर उषा ढोरे यांच्यासह महापालिका पदाधिकारी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, प्रा. उत्तम केंदळे, नगरसेविका शैलजा मोरे, कमल घोलप, शर्मिला बाबर, सहशहर अभियंता सवणे आदींनी पुलाची पाहणी केली.
पुलाचे काम अपूर्ण आहे. छोटी-छोटी कामे बाकी आहेत. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ लागेल, असे प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे सुरक्षिततेची कामे करण्यासाठी पूल दहा दिवस बंद ठेवण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.
- उषा ढोरे, महापौर
अपूर्ण कामे पूर्ण केली जाणार आहेत. पुलावर अपघात होत आहेत. दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालक गोंधळातात. स्पीड ब्रेकर, दिशादर्शक, स्पीड लिमिटचे फलक लावण्यात येणार आहेत. सुरक्षिततेची कामे केली जाणार आहेत.
- नामदेव ढाके, पक्षनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.