Video: सरकार चित्रपटाच्या साम दाम दंड भेद गाण्यावर टोळी नाचताना दिसतेय.
सोशल मिडियावर थेरगाव क्वीन (Thergaon queen) नावनं अकाऊंट तयार करत शिव्या आणि धमक्या देत व्हिडिओ तयार करणाऱ्या एका युवतीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) चांगलाच धडा शिकवला. सोशल मिडियावर (Social Media) रील व्हायरल (Thergaon Queen Reel) करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'थेरगाव क्विन' आणि तिच्या मित्रांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यांना वठणीवर आणण्याचं काम केलं. हे सर्व प्रकरण चर्चेत असतानाच या तरुणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
पोलिसांनी या तरुणीला समज देऊन सोडलं असून, या तरुणीसह असणाऱ्या एका कुणाल कांबळे नावाच्या युवकाने पोलिसांसमोर माफी मागितली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तुरुंगाबाहेर आल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातं आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबद्दल स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.