Municipal Commissioner Rajesh Patil
Municipal Commissioner Rajesh Patil Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोरोनामुळे महापालिका निवडणूक लांबली आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यांचा कालावधी किती असेल, हे महापालिका अधिनियमात नमूद नाही.

पिंपरी - महापालिकेची (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मुदत १३ मार्च रोजी संपणार आहे. वेळेत निवडणूक (Election) होणे शक्य नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकपदी (Administrator) आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांची राज्यपालांच्या आदेशानुसार नियुक्ती (Selection) करण्यात येत असल्याचे राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक (Mahesh Pathak) यांनी कळविले आहे. महापालिकेची मुदत संपताच प्रशासकांनी कार्यवाही सुरू करावी असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकपदाचा कारभार १४ मार्चपासून आयुक्त हाती घेणार असल्याचे स्पष्ट झाले.

कोरोनामुळे महापालिका निवडणूक लांबली आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यांचा कालावधी किती असेल, हे महापालिका अधिनियमात नमूद नाही. मात्र, निवडणूक होऊन निकाल लागल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा होईपर्यंत कारभार प्रशासकाच्या हाती असतो. दरम्यान, आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला आहे.

तीन सदस्यीय पद्धतीनुसार तयार केलेल्या आराखड्यावर आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणीही झाली आहे. त्याबाबतचा अहवाल बुधवारी (ता. २) निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवाय, प्रभागनिहाय मतदार याद्यांची विभागणी करून त्याही प्रारूप स्वरुपात आयोगाला सादर केल्या आहेत. प्रभाग रचनेवरील सुनावणीबाबतचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी पाच मार्चपर्यंत आयोगाला सादर करायचा होता. त्यापूर्वीच तो सादर केला आहे.

निवडणूक लांबली

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीचा कार्यक्रम २७ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार २१ फेब्रुवारीला मतदान होऊन २३ फेब्रुवारीला मतमोजणी झाली होती. या वेळी मात्र, कोरोनामुळे निवडणूक लांबली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गियांचे राजकीय आरक्षणाबाबतचा मागास आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. परंतु, राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. तुर्त महापालिकेवर प्रशासकीय कारभार किती दिवस राहणार, हे सांगणे अनिश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT