चिंचवड स्टेशन, ता. २ ः के. एस. बी. चौकापासून पूर्णानगरपर्यंतच्या सायकल ट्रॅक वर ठिकठिकाणी अतिक्रमण निर्माण झाल्यामुळे येथील सायकल ट्रॅक गायब झाला आहे.
महापालिकेच्या वतीने दहा ते बारा वर्षांपूर्वी शाहूनगर-पूर्णानगर भागात रस्त्याच्या कडेला ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात आला होता. लाखो रुपये खर्च करून हा ट्रॅक सायकलस्वारांसाठी उभारण्यात आला आहे. परंतु अनेक ठिकाणी दुकानदारांकडून त्यांचे सामान रस्त्यावर मांडले जाते. गॅरेज चालविणारा त्याच्या गॅरेजमधील दुचाकी रस्त्यावर लावताना दिसत आहे. तसेच काही ठिकाणी सोसायट्यांतील नागरिक ‘पार्किंग’ साठी या ट्रॅकचा उपयोग करत आहेत. दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून या ट्रॅकवर वाहने लावण्यात येतात. अशा सर्व अडचणी निर्माण झाल्यामुळे सायकलस्वाराला मार्गच राहिला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून सायकल घेऊन जावे लागत असल्याने अपघाताचा धोका आहे वाढला आहे.
शेजारील सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक त्यांची वाहने येथे उभी करतात. अनेक दुकानदारही या रस्त्यावर त्यांचे साहित्य ठेवतात. त्यामुळे, ट्रॅकचा वापर करता येत नाही.
- ओंकार खेडकर, स्थानिक रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.