पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवीत अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

CD

पिंपरी, ता. १ ः येथे श्री संत गजानन महाराज यांच्या १४८व्या प्रकट दिनानिमित्त व श्रींच्या २१व्या मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार (ता. २) ते सोमवार (ता. ९) अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान रोज रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन होणार आहे. यात सचिन दादा महाराज पवार (पुणे), पंढरीनाथ महाराज वाघ कोल्हाळा (बुलढाणा), श्रीगुरू डॉ. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर), संजय नाना महाराज धोंडगे (त्रिंबकेश्वर), ओंकार महाराज सूर्यवंशी (कोल्हापूर), पोपट महाराज फरकाडे (संभाजीनगर), महंत नितीन दासजी महाराज आहेर (मलकापूर), उत्तम महाराज बडे (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे.
सोमवारी (ता. २) सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात होईल तर शनिवारी (ता. ७) ज्ञानेश्वर पारायण समाप्ती करण्यात येईल. रविवारी (ता. ८) श्रींच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण, पारायणकर्ते श्री विद्याधर जोशी पाषाणकर याच दिवशी श्रींची आरती व महाप्रसाद पिठलं-भाकरी, प्रकटदिनी सोमवारी (ता. ९) श्रींचा काला, काल्याचे कीर्तन त्यानंतर काल्याचा महाप्रसाद, श्रींची पालखी दिंडी नगर प्रदक्षिणा असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, रोज प्रात:काल काकडा आरती, सायंकाळी हरिपाठ, सकाळी अभिषेक, गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारच्या सत्रात महिला भजन, रात्री हरी कीर्तन, श्रींची आरती, हरिजागर होणार आहे. सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे निलख व परिसरातील भजनी मंडळ भजन सेवा देणार आहेत, असे सर्व विश्वस्त व सेवेकरी श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास सांगवी यांच्या वतीने सांगण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT