पिंपरी-चिंचवड

दापोडी परिसरात अजितदादांचे स्मृतिस्थळ उभारावे

CD

पिंपरी, ता.१ : ‘‘आपल्या कर्तृत्वाचा जनमानसावर ठसा उमटवणारे स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी दापोडीत त्यांचे स्मृतिस्थळ उभारण्यात यावे,’’ अशा भावना सर्वपक्षीयांकडून आयोजित शोकसभेत नागरिकांनी व्यक्त केल्या.
दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग शाळेत आयोजित या शोकसभेला आजी माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांसह दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील नागरिक मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
श्रद्धांजली सभेत बोलताना सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी अजितदादांच्या कामाच्या शैलीवर प्रकाश टाकला.
अजित पवार यांची प्रशासनावरील पकड मनमिळाऊ स्वभाव यापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्याशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नातेसंबंधांपर्यंत अनेक किस्से यावेळी सांगण्यात आले. ‘‘अजितदादा हे केवळ एक नेते नसून कार्यकर्त्यांसाठी मोठा आधार होते,’’ अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
जुनी सांगवी येथेही सर्वपक्षीय शोकसभा पार पडली. यावेळी अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
श्रद्धांजली सभेत बोलताना आजी-माजी लोकप्रतिनिधींनी दादांच्या कामाच्या शैलीवर प्रकाश टाकला. दादांचा कामाचा उरक, सकाळीच सुरू होणारा जनसंपर्क आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याची तळमळ याबद्दलचे अनेक किस्से यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhaisal Panchayat Samiti : प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच धक्का! भाजप उमेदवाराच्या पतीचे हृदयविकाराने निधन; म्हैसाळ पंचायत समिती गणात शोककळा

Devendra Fadnavis: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सांगितले नाही: देवेंद्र फडणवीस, माझ्याकडेही अनेक गोष्टी सांगण्यासारख्या!

Supriya Sule: संसदेत चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची! विविध पक्षांच्या नेत्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेऊन केले सांत्वन

Union Budget 2026 : मुंबईत ग्रोथ हबसाठी ५ हजार कोटी, तर मेट्रोसाठी १७०२ कोटी

MLA Rohit Pawar: तेरा दिवस राजकारण नाही: आमदार रोहित पवार, बोडके परिवाराची भेट घेत केले सांत्वन!

SCROLL FOR NEXT