पिंपरी-चिंचवड

स्थानिक व्यावसायिकांना मॉलचा फटका

CD

पिंपरी, ता. १७ ः मॉल्स, ब्रॅंडेड स्टोअर्स आणि आक्रमक मार्केटिंग यामुळे शहरातील पारंपारिक स्थानिक दुकान मालकांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. एकेकाळी किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, बूट आणि घरगुती वस्तू खरेदीसाठी स्थानिक दुकानालाच ग्राहक पसंती देत. मात्र, गेल्या काही वर्षांत मॉल संस्कृती झपाट्याने वाढत असल्यामुळे ग्राहकांचा ओढा तिकडे वाढला आहे. त्याचा परिणाम स्थानिक दुकान मालकांच्या व्यवसायावर पडत आहे.
वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील बाजारपेठाही झपाट्याने विस्तारत आहेत. एकेकाळी किराणा, कपडे, बूट किंवा इतर वस्तू खरेदी करताना ओळखीतील स्थानिक विक्रेत्यावर नागरिकांचा अधिक विश्वास असायचा. मात्र, आता त्या ठिकाणी मोठे मॉल्स आणि ब्रॅंडेड स्टोअर्सने आपली पकड मजबूत केली आहे. महाग भाडे, वाढते वीजदर, मर्यादित पार्किंग आणि ग्राहक आकर्षित करण्यासाठी करावा लागणारा जाहिरात खर्च या सर्व गोष्टी छोट्या दुकानदारांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. दुसरीकडे, मॉलमधील स्टोअर्स हे आकर्षक सवलती, कॅशबॅक आणि फेस्टिव्हल ऑफर्स देऊन ग्राहकांना खेचत आहेत. वातानुकूलित वातावरण, एकाच छताखाली विविध ब्रॅंड्स आणि मनोरंजनाच्या सुविधा यामुळे विशेषतः तरुण ग्राहकांचा कल मॉल्सकडे अधिक आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक दुकान मालकांना ब्रॅंडेड स्टोअर्ससोबत स्पर्धा करणे अधिकच कठीण होत चालले आहे.


अडथळ्यांची शर्यत...
- व्यावसायिक जागेचे भाडे, वीजबिल, सुरक्षा व देखभाल खर्चात सतत वाढ
- मॉल्समधील ऑफर्स, कॅशबॅक व डिस्काउंट्सशी स्पर्धा अशक्य
- घाऊक बाजारातील दर वाढल्याने कमी मार्जिनमध्ये व्यवसाय चालवणे कठीण
- ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे दुकानातील विक्रीत घट
- दुकाने स्थलांतरित करूनही प्रतिसाद मिळेना

व्यापाऱ्यांनी हे आवश्य करावे...
- ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून सेवा द्यावी
- नियमित ग्राहकांसाठी विशेष सुविधा किंवा मेंबरशिप योजना राबवावी
- फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर दुकानाची उत्पादने दाखवावी
- छोटा ऑनलाइन कॅटलॉग किंवा मिनी वेबसाइट तयार करावी
- व्हॉट्सअॅपद्वारे ऑर्डर बुकिंगची सुविधा
- ठराविक परिसरात फ्री किंवा कमी शुल्कात होम डिलिव्हरी

मॉल्समधील आकर्षक वातावरण, मोठ्या सवलती आणि आक्रमक मार्केटिंगमुळे आमच्या दुकानात येणाऱ्या पारंपारिक ग्राहकांवर परिणाम पडला आहे. पूर्वी नियमित येणारे ग्राहकही आता ब्रॅंडेड स्टोअर्सकडे वळत आहेत. भाडे, वीजबिल आणि इतर खर्च वाढत असताना व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे. काही ठिकाणचे व्यवसाय बंद करावे लागले आहेत.
-प्रकाश देशमुख, व्यापारी


मॉलमध्ये एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध असल्याने खरेदी करणे सोपे होते. पार्किंगपासून ते पेमेंटपर्यंत सर्व सुविधा मिळतात. एकाच परिसरात अनेक ब्रॅंडच्या वस्तू खरेदी करण्याची सोय असते. बजेटनुसार कोणती वस्तू घ्यायची, हे ठरवणे तत्क्षणी सोपे जाते. याउलट पारंपारिक व्यापाऱ्यांकडे व्हरायटीज मिळत नाही. त्यामुळे खरेदी करणे अवघड होते.
-धीरज थोरात, ग्राहक

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT