पिंपरी-चिंचवड

वैष्णोमाता शाळेतील समस्या सुटेनात

CD

पिंपरी, ता. १६ : महापालिकेच्या इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता प्राथमिक विद्यालयातील वाढत्या गैरसोयी आणि दुरवस्थेबाबत पालकांनी गंभीर आक्षेप नोंदवत प्रशासनाकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली. अधिकारी समस्या सोडवत नसल्याची पालकांनी तक्रार केली आहे.
शाळेतील खेळण्यांची दुरवस्था झाली असून घसरगुंडी मोडकळीस आली आहे. खेळाच्या परिसरात टाकलेली रेती, माती वर्गखोल्यांमध्ये उडून विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. शाळेतील पाणीपुरवठ्याचे नळ तुटलेले, सिंटेक्स टाक्यांचे जोड तुटलेले असल्याने स्वच्छतागृहाचा वापर बंद आहे. सुटीनंतर शाळेची इमारत इतर कामांसाठी वापरली जात असल्याबाबतही पालकांनी नाराजी व्यक्त केली.
सहा महिन्यांपूर्वी अनधिकृतरीत्या बांधण्यात आलेली संगणक प्रयोगशाळेची खोली अद्याप अपूर्ण आहे. वीजपुरवठा, रंगकाम आणि फिर्निशिंगचे काम बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळेच्या आवारालगत उच्चदाब वीजवाहक तारा आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. नाल्याची दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचेही पालकांनी सांगितले.
संबंधित कनिष्ठ, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना दुरुस्तीबाबत मागणी केली. त्यांनी ही कामे करण्याची तत्परता दाखविलेली नाही. महापालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि हिताचा विचार करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक अॅड. प्रभाकर तावरे पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget 2026 : मुंबईत ग्रोथ हबसाठी ५ हजार कोटी, तर मेट्रोसाठी १७०२ कोटी

MLA Rohit Pawar: तेरा दिवस राजकारण नाही: आमदार रोहित पवार, बोडके परिवाराची भेट घेत केले सांत्वन!

‘द केरळ स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शित

Mumbai Missing Minors : मुंबई हादरली ! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता; पोलिसांकडून विशेष शोधमोहीम सुरू, हाय अलर्ट जारी

Pune News: बारामतीत साकारणार अजित पवार यांचे स्मारक; शरद पवार यांची इच्छा, विद्या प्रतिष्ठान संकुलातील जागा!

SCROLL FOR NEXT