सोमाटणे, ता. ३० : पर्यटक नसताना मिळणाऱ्या वेळेचा उपयोग करत कासारसाई पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धरणालगतच्या माळरान जमिनीवर शेती फुलवली आहे. पूर्वी दगडगोट्यांनी भरलेली, नापीक असलेली ही जमीन त्यांच्या कष्टामुळे अल्पावधीतच बागायती शेतीत रुपांतरित झाली आहे.
कासारसाई धरण परिसरात गेल्या काही वर्षांत पर्यटकांची संख्या वाढली आहे. यामुळे पाटबंधारे कर्मचाऱ्यांवर जबाबदारीही वाढली आहे. येथे दिवसभर सतर्क राहून ते पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ते पार पाडत आहेत. या धावपळीच्या कामकाजातही सकाळ-सायंकाळ वेळ काढून या कर्मचाऱ्यांनी ही बागायती शेती फुलवली आहे.
सध्या लग्नसराईमुळे फुलशेतीला चांगले बाजारभाव मिळत असल्याने शाखा अभियंता अमर धायगुडे यांच्या सहकार्याने पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या शेतात झेंडूच्या फुलांची लागवड करण्यात आली आहे. योग्य प्रमाणात पाणी आणि खतांचा वापर केल्यामुळे झेंडूच्या फुलांची वाढ झाली असून, सध्या फुले तोडणीस तयार झाली आहेत.
शासकीय कर्तव्य पार पाडतही सुयोग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर शेती यशस्वी करता येते, हा संदेश या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. ‘‘कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास शेतीत काहीही अशक्य नाही,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले असून शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक सकारात्मक आदर्श उभा केला आहे.
PNE26V91107
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.