पिंपरी-चिंचवड

ओला, सुका, घातक व सॅनिटरी कचरा वेगळा द्यावा

CD

पिंपरी, ता. ३० : शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी घरगुती कचरा चार प्रकारांत विलगीकरण करून घंटागाडीला द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागांतर्गत स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी घराघरांत संपर्क, फलक, पत्रके, समाजमाध्यमांद्वारे संदेश, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रबोधन केले जात आहे. नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे. योग्य पद्धतीने विलगीकरण केल्यास कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे सोपे होते. पुनर्वापराचे प्रमाण वाढते, लँडफिलवरील ताण कमी होतो आणि पर्यावरण संवर्धनास चालना मिळते. तसेच शहरातील दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग व प्रदूषण नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी घरातील कचरा चार प्रकारांत वेगळा करून तो वेळेत महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा. कचरा इतरत्र न टाकता नियमानुसार संकलन वाहनालाच देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

कचऱ्याचे असे करा विलगीकरण
- ओला कचरा ः उरलेले अन्नपदार्थ, भाजीपाल्याचे तुकडे, फळांच्या साली इत्यादी; यासाठी हिरव्या रंगाच्या डब्याचा वापर करावा.
- सुका कचरा ः कागद, प्लॅस्टिक, काच, धातूच्या वस्तू, यासाठी निळ्या रंगाच्या डब्याचा वापर करावा.
- घरगुती घातक कचरा ः बॅटऱ्या, ट्यूबलाइट, बल्ब, औषधांचे अवशेष, रसायनयुक्त वस्तू यासाठी काळ्या रंगाच्या डब्याचा वापर करावा.
- सॅनिटरी कचरा ः सॅनिटरी पॅड, डायपर, वैद्यकीय वापरातील साहित्य यासाठी लाल रंगाच्या डब्याचा वापर करावा.

‘‘शहर स्वच्छतेसाठी कचरा विलगीकरण अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी ओला-सुका कचरा एकत्र न देता चार विविध प्रकारांत विलगीकरण करून तो महापालिकेच्या घंटागाडीला देत प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Union Budget 2026 Live : मंदिरांसाठी ५ हजार कोटींची तरतूद, अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

Union Budget 2026 : अर्थसंकल्पात पुण्यासाठी मोठं गिफ्ट ! मुंबई- पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची घोषणा, दोन्ही शहरांतील अंतर होणार आणखी कमी

Stock Market Updates : बजेटसुरू होताच शेअर बाजार उसळला! सरकारचा 7 धोरणात्मक क्षेत्रांवर भर, कोणते सेक्टर तेजीत?

Union Budget 2026 : भारतात सुरू होणार सेमी कंडक्टर मिशन; यंदा 40 हजार कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद, तंत्रज्ञान क्षेत्रावर जास्त भर

Union Budget 2026 : खादी, हातमाग व हस्तकला क्षेत्राला अर्थसंकल्पातून मिळणार नवे बळ; निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT