पिंपरी-चिंचवड

केंद्राच्या अंदाजपत्रकात उद्योजकांच्या मागण्यांचा समावेश करा

CD

पिंपरी, ता. ३१ ः केंद्र सरकारच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात उद्योजकांच्या मागण्यांचा समावेश करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील फेडरेशन ऑफ एम.एस.एम.ई. या उद्योजक संघटनेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. गोविंद पानसरे यांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये एम.एस.एम.ईची वाढ व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज वितरण पद्धतीत सुलभता आणावी. लघुउद्योगाच्या संरक्षणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म प्रक्रिया सुलभ करावी. अमेरिकेच्या वाढीव शुल्काने प्रभावित उद्योगांना प्रोत्साहनपर योजना सुरू करावी. विनातारण विना जामीन पत पुरवठ्याची मर्यादा पाच कोटींवरून दहा कोटी करा. निर्यातीत सुलभता आणण्यासाठी डिजिटल प्रक्रियेत एआयचा वापर करावा. जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्याकरिता उद्योगाला मार्केटिंगसाठी मदत करावी, अशा मागण्यांचा केंद्राच्या अर्थसंकल्पात समावेश करावा, अशी मागणी पानसरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : वैभव सूर्यवंशी भडकला, पाकिस्तानी फलंदाजाला घातल्या शिव्या; विहानने अडवलं नाहीतर झालाच असता मोठा राडा

Stock Market Today : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्सला फायदा?

दोन बलूच महिलांनी आत्मघाती हल्ल्यांनी पाकिस्तानमध्ये केला विध्वंस, २४ वर्षीय तरुणीनं बर्थडेलाच घेतलेली शपथ

Jyotiba Temple Kolhapur : 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात डोंगर दुमदूमणार; 'या' तारखेपासून देवाच्या खेट्यांना होणार प्रारंभ

Pune News: पुण्याहून मुंबई, हैदराबादला बुलेट ट्रेन! विक्रमी दोन लाख ८१ हजार ३७७ कोटींची तरतूद, नेमका कसा मार्ग..

SCROLL FOR NEXT