पिंपरी-चिंचवड

पवनमावळ परिसरात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

CD

सोमाटणे, ता. २ : तापमानात सततच्या बदलांमुळे पवनमावळ परिसरात सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून रात्रीची थंडी आणि दिवसा कडक ऊन अशा बदलत्या हवामानाचा ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी सर्दी, ताप व खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आढले येथे दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या किमान साठच्या पुढे जात असल्याचे चित्र आहे.
हा आजार टाळण्यासाठी दुपारच्या वेळी शेतातील कामे टाळावीत, सनकोट किंवा टोपीचा वापर करावा, थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे परिधान करावेत. तसेच पिण्याचे पाणी शुद्ध असावे. पुरेसा आहार ठेवावा. दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यावे, असे आढले प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mayor : कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, पण किती काळ? चंद्रकांतदादांनी केला मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला होता : जितेंद्र आव्हाड

Navi Mumbai Mayor: नवी मुंबई सत्तेसाठी भाजप-सेना आमनेसामने! महापौर कोण होणार? निवडणुकीच्या तारखेसह 'या' 2 नेत्यांची नावे समोर

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी का घातला गोंधळ? विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिलं नाही; कामकाज तहकूब करण्याची वेळ

Viral : चार वर्षांच्या मुलाला शेतात खेळताना सापडला ४०० वर्षांपुर्वीचा खजिना, किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील

SCROLL FOR NEXT