पिंपरी-चिंचवड

मुकाई चौकातून हिंजवडीसाठी अतिरिक्त बससेवा सुरु

CD

रावेत, ता. ७ : वाकड-हिंजवडी मार्गावरील वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करून पीएमपीएमएल प्रशासनाने अतिरिक्त बससेवा सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच मुकाई चौकातील नवीन पास केंद्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांपासून ते कार्यालयीन कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असल्याने महामार्गावरील वाहतूक वाढते. बस फेऱ्यांमध्ये असणारा तुटवडा, गर्दी आणि अनियमित वेळापत्रक यामुळे प्रवास त्रासदायक होत होता. मात्र अतिरिक्त बसगाड्या धावू लागल्यानंतर प्रवास सुरक्षित झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले. मुकाई चौकात उभारण्यात आलेल्या पास केंद्रामुळे परिसरातील रहिवाशांना पास नूतनीकरण आणि खरेदी सोईचे झाले आहे.

दैनिक प्रवास बसवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा आहे. पूर्वी गर्दीमुळे बसमध्ये चढणे कठीण व्हायचे. आता फेऱ्या वाढल्याने प्रवासी आरामात प्रवास करू शकत आहेत. पास केंद्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनाही लाभ मिळाला आहे.
- अभिजित पांढरे, आयटी कर्मचारी

वाकड-हिंजवडी मार्ग वाहतूक कोंडीने नेहमीच त्रस्त असतो. अशा वेळी अतिरिक्त बससेवा उपलब्ध होणे ही मोठी मदत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि कामगारांना वेळेवर पोहोचणे शक्य झाले आहे.
- सोमेश्वर गायके, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला होता : जितेंद्र आव्हाड

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

Pune Drama Festival: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 'सकाळ एकांकिका महोत्सव', कसं करायचं बुकिंग ?

SCROLL FOR NEXT