पिंपरी-चिंचवड

येलवाडी ते देहू रस्ता काँक्रिटीकरणाला हिरवा कंदील

CD

तळेगाव स्टेशन, ता. १६ : येलवाडी ते देहू या दोन किलोमीटर रस्त्याचे अखेर काँक्रिटीकरण होणार आहे. याबाबतचा कार्यारंभ आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कार्यकारी अभियंता वसंत नाईक यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे हे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी वरील देहू फाटा ते येलवाडीमार्गे श्री क्षेत्र देहू या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. देहू फाटा ते येलवाडी गाव प्रवेशद्वार या दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सतत छोटे, मोठे अपघात आणि वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीच्या वतीने वारंवार निवेदने आणि विनंत्यासह पाठपुरावा केला. त्याची दखल घेत ‘पीएमआरडीए’ने जुलैमध्ये या कामाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रक्रिया रखडल्याने कृती समितीने सप्टेंबरमध्ये येलवाडी येथे उपोषणदेखील केले होते. अखेर या कामाला आता मुहूर्त मिळाला आहे.
मोशी येथील व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्रा.लि. या कंपनीने १९ टक्के कमी दराने निविदा भरली होती. तिचा स्वीकार करून प्रशासनाने स्वीकृत निविदा रक्कम ५९ कोटी ६७ लाख २७ हजार रुपयांचा कार्यादेश जारी केला आहे.

नागरिकांकडून समाधान
दोन किलोमीटर रस्त्याचे ३० मीटर रुंदीने काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा मुदत १२ महिने असून, देखभाल दुरुस्ती कालावधी कालावधी १५ वर्षे इतका असणार आहे. गेले काही महिने रखडलेल्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याने स्थानिकांसह, एमआयडीसी कामगार आणि कृती समिती पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT