पिंपरी-चिंचवड

बाजार समिती संचालकांनी घेतली पटोले यांची भेट

CD

वडगाव मावळ, ता. २० : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने १८ पैकी १७ जागा जिंकून वर्चस्व मिळवले. आघाडीच्या काही नवनिर्वाचित संचालकांनी जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. संभाजी राक्षे, संभाजी शिंदे, मारुती वाळुंज, विलास मालपोटे, शिवाजी असवले, शंकर वाघमारे, अमोल मोकाशी, विक्रम बोडके, नितीन बोडके, शांताराम लष्करी, जांभूळकर गुरुजी आदींचा त्यात समावेश होता. प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा सत्कार करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणूक व तालुक्यातील घडामोडींवर चर्चा करण्यात आली. लोकसभेची पुणे व मावळची जागा पक्षाला नक्की मिळेल, अशी माहिती पटोले यांनी दिली. तालुकाध्यक्ष पदाबाबत आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन पटोले यांनी दिले अशी माहिती माजी युवक अध्यक्ष विलास मालपोटे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT