पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये मास्कमुळे कोटींची उलाढाल; कसं चाललंय हे अर्थकारण पाहा... 

सुवर्णा नवले

पिंपरी : ऐन लॉकडाउनमध्ये सगळं शहर लॉक झालं असताना बचतगट व लघु उद्योजकांसाठी मास्क वरदान, तर शहरासाठी सुरक्षा कवच ठरले आहे. तब्बल एका महिन्यात पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत 15 लाख मास्कच्या माध्यमातून दीड कोटींच्यावर उलाढाल झाली. परिणामी, मंदीच्या काळातही शिलाई मशिनच्या चाकांचा वेग शहरासाठी 'अर्थ'पूर्ण ठरला आहे.

कोरोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कापडी मास्क हे सर्वांसाठी अत्यावश्‍यक बाब होती. मास्क वापरणे 24 मार्चपासून बंधनकारक झाले असल्याने 15 कंटेन्मेंट झोन, हाय रिस्क परिसर व झोपडपट्टी भागात कापडी मास्कचे वाटप करणे मोठे आवाहन होते. त्याकरिता मास्क मिळविण्यासाठी मोठी कसरत महापालिकेला करावी लागली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी महापालिकेने प्रत्येक झोपडीमध्ये कापडी मास्क 8 नग देण्याचे जाहीर केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मास्कचा तुटवडा जाणवला. कंटेन्मेंट झोनमधील भागात 8 ते 9 लाख कापडी मास्कची गरज निकडीची होती. त्याकरिता बाजारपेठेत व इतर ठिकाणी कापडी मास्कबाबत विचारणा करूनही मास्क महापालिकेला उपलब्ध झाले नाही. बाजारपेठा व सर्व व्यवहार ठप्प असल्याने मास्कसाठी लागणारे साहित्य देखील बाजारपेठेतून मिळत नसल्याने तातडीची ऑर्डर घेण्यासही बऱ्याच व्यावसायिकांनी संसर्गाच्या भीतीने ऐनवेळी नकार दिला. अशावेळी महापालिकेने छोट्या व्यावसासायिकांकडून मदत घेऊन बचत गटांना मास्कचे काम दिले. चक्क दहा दिवसांत अवघ्या दहा रुपयांत बचत गटांनी व काही संस्थानी लाखो मास्क तयार केले. त्यानुसार महापालिका हद्दीतील दवाखान्यांना मास्क वाटपाची जबाबदारी सोपविण्यात आली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मास्कसाठी अशी झाली कसरत

  • ऐन लॉकडाउनमध्ये मास्कसाठी कापडाचा तुटवडा
  • मास्कसाठी दोरा व इलॅस्टिक मिळणे झाले अवघड
  • शिलाई कारागिरांचीही कमतरता
  • कोल्हापूर, येरवडा, नाशिक, ठाणे मध्यवर्ती कारागृहाला मास्कसाठी विचारणा
  • महिला आर्थिक विकास महामंडळाकडे मास्कसाठी विचारणा
  • अवास्तव दराची मागणी

बचतगट - बनवलेले मास्क 

  • कुलस्वामिनी महिला बचत गट- 1 लाख 50 हजार
  • साई एंटरप्रायझेस - 3 लाख 
  • आरंभ एंटरप्रायझेस-  3 लाख
  • गुरुनुर एंटरप्रायझेस- 1 लाख 80 हजार
  • आनंद एंटरप्रायझेस- 50 हजार
  • महिला बचतगट- 20 हजार
  • श्रीकृष्ण महिला बचतगट- 20 हजार
  • एडिशन लाईफ सायन्स- 1 लाख
  • दिगंबरा महिला बचतगट- 1 लाख 30 हजार
  • महावीर एंटरप्रायझेस- 20 हजार
  • ओम क्रिएशन- 30 हजार
  • आरंभ महिला बचतगट- 50 हजार
  • लक्ष्मी महिला बचतगट- 1 लाख 50 हजार
  • एकूण 15 लाख

इथे झाले वाटप (कंटेन्मेंट झोन)

  • पडवळकरनगर, थेरगाव
  • घरकुल, चिखली
  • खराळवाडी
  • गणेश पापड केंद्र व गुरुदत्त कॉलनी, भोसरी
  • अक्षरा जनरल स्टोअर, शास्त्री चौक, भोसरी
  • विशाल जुन्नर पतपेढी व पीएमटी चौक भोसरी
  • आदिनाथ नगर मैदान परिसर, भोसरी
  • लांडगे चाळ, भोसरी 
  • साई हॉस्पिटल, दिघी
  • गणेश नगर, दापोडी
  • गुरुनानक ऑटो गॅरेज, कासारवाडी
  • साई सुपर मार्केट, संभाजीनगर
  • यमुनानगर हॉस्पिटल परिसर
  • पार्क रोड, पिंपळे गुरव

या झोपडपट्टी भागात होती तातडीची गरज

चिंचवड, निगडी, किवळे, आकुर्डी, नेहरूनगर, पिंपरी, काळेवाडी, वाकड, थेरगाव, पिंपळेगुरव, कासारवाडी, दापोडी, भोसरी, बोऱ्हाडेवाडी-चिखली.

कापडी मास्क - नग

  • एकूण मास्क प्राप्त - 15 लाख 
  • एकूण मास्क वाटप - 10 लाख 25 हजार 249
  • शिल्लक - 4 लाख 74 हजार 751

साबण 125 ग्रॅम - नग

  • साबण प्राप्त नग - 1 लाख 60 हजार
  • एकूण साबण वाटप - 1 लाख 59 हजार 382
  • शिल्लक - 618

लॉकडाउनमध्ये निविदा काढणे अवघड होते. कारण स्टॅम्पपेपर उपलब्ध नव्हते. खूप कमी दिवसांत ऑर्डर गरजेची होती. ती बऱ्याच जणांना शक्‍य झाली नाही. मात्र, प्रयत्न केल्यानंतर विविध छोटे व्यावसायिक व बचतगटांकडून सर्वांत कमी दरात मास्क उपलब्ध झाले. त्यामुळे मदत झाली.

- मंगेश चितळे, सहायक आयुक्त, भंडार विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT