Whale Omit
Whale Omit Team eSakal
पिंपरी-चिंचवड

Whale माशाच्या १ कोटींच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

सुधीर काकडे

व्हेल (whale fish) प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही ‘स्पर्म’ (whale sperm) व्हेलच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व असून तिला भरमसाठ दर मिळून कोट्यवधीची कमाई मिळते. गेल्या काही दिवसांपासून व्हेल माशाची उलटी (Ambergris) आणि त्याबद्दलची वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहे. अत्यंग महागड्या असणाऱ्या या पदार्थाच्या तस्करीवरून पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) देखील अशीच एक घटना समोर आली असून, पोलिसांनी कोट्यवधीच्या उलटीसह आरोपींना अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी मोठी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी अंबरग्रीसची तस्करी केल्याप्रकरणी या आरोपींना अटक केली आहे. या उलटीची किंमत 1.1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी नैसर्गिक तत्त्व म्हणून ती वापरतात. त्याचा आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना दर अधिक मिळतो. यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते.

उलटी कशी ओळखतात

स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारख किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT