Jaywant Wadkar talk about worli hit and run case Esakal
Premier

Worli Hit & Run Case: 'वरळी हिट अँड रन' प्रकरणातील मृत महिला अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी ; "आरोपीला फाशी..."अभिनेत्याने व्यक्त केला संताप

Jaywant Wadkar Expressed His Feeling About Worli Hit & Run Case: अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्ख्या पुतणीचा वरळी हिट अँड रन केसमध्ये मृत्यू झाला. याबाबत त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

सकाळ डिजिटल टीम

Jaywant Wadkar : पुण्यातील पोर्शे कार प्रकरणानंतर 'वरळी हिट अँड रन' केस सध्या चर्चेत आहे. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरून गेली आहे. दक्षिण मुंबईतील वरळी येथे एका बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यामुळे कावेरी नाखवा या ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही कार त्यावेळेस शिवसेना शिंदे गटाचे उपनेते असलेल्या राजेश शाह यांचा मुलगा मिहीर चालवत होता. त्यामुळे प्रकरण सध्या खूप तापलं आहे.

या अपघातात मृत झालेली महिला ही मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी आहे. महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जयवंत या प्रकरणाबाबत व्यक्त झाले आणि त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. जयवंत वाडकर असं म्हणाले कि,"या आरोपींना कठोर कायदा काढून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशा पद्धतीने गाडी चालवणं ही केवळ विकृती आहे. गाडी चालवणाऱ्या प्रत्येक माणसाला या सगळ्याची जाणीव पाहिजे. आपण गाडीसमोर साधा उंदीर जरी आला तरी थांबतो त्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. इथे तर तुमच्या गाडीसमोर एखादी व्यक्ती येते आणि तुम्ही तिला फरफटत घेऊन जाता ही गोष्ट किती वाईट आहे. त्यानंतर गाडी तशीच सोडून पळून जाणं हे आणखी वेदनादायी आहे."

पुढे ते असं म्हणाले कि,"मी शासनाला एवढीच विनंती करेन की, कृपया या आरोपीवर दया दाखवू नका. कारण, तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तो रात्री बारमध्ये दारू प्यायला, अठरा हजारांचं बिल झालं. त्यावेळी मर्सिडीज गाडी होती मग, ही बीएमडब्ल्यू गाडी कुठून आली? त्याची मैत्रीण कोण आहे. याप्रकरणी शासनाने एकालाही सोडता कामा नये. मला पोलिसांवर विश्वास आहे आणि ते योग्य कारवाई करतील याची खात्री आहे. अशा लोकांना सोडू नये असं माझं प्रामाणिक मत आहे कारण, सध्या एका पाठोपाठ एक अशा घटना घडल्या आहेत."

"कावेरी माझी सख्खी पुतणी आहे. त्यामुळे याबद्दल मी अजून काय बोलू मला खरंच सुचत नाही. त्या पोरीची आता गणपतीमध्ये खूप आठवण येईल. तिने सगळं कष्ट करून हे उभं केलं होतं. त्यामुळे तिची आठवण मला कायम येत राहणार…" असंही ते यावेळी म्हणाले.

रविवारी ७ जुलैला वरळीतील अट्रिया मॉलजवळ असलेल्या लँडमार्क जीप येथे प्रदीप नाखवा यांच्या स्कुटरला मिहीरच्या गाडीने मागून धडक दिली. या अपघातात प्रदीप गाडीवरून डाव्या बाजूला पडले आणि कावेरी गाडीवर पडल्या. कावेरी या गाडीत अडकल्या होत्या. मिहीर त्यांची पर्वा न करता त्यांना बरंच अंतर घसपटत घेऊन गेला आणि नंतर पुढे पळून गेला. कावेरी यांचा या अपघातात मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT