Junaid Khan  Esakal
Premier

Junaid Khan : "बाबांपेक्षा किरण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री"; सावत्र आईचं कौतुक करताना जुनैद म्हणाला...

Junaid Khan talks about Kiran Rao : आमिर खानचा लेक जुनैद खानने त्याची सावत्र आई किरण राव ही त्यांच्या घरातली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्याचं शेअर केलं.

सकाळ डिजिटल टीम

Junaid Khan Interview : अभिनेता आमिर खानचा लेक जुनैद खानने 'महाराज' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केलं. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील जुनैदच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली. नुकतंच जुनैद सिद्धार्थ कन्नन या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या सावत्र आई किरण राव विषयी बरेच खुलासे केले.

किरण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

सिद्धार्थ कन्ननला त्याच्या करिअरच्या सुरुवातीविषयी विचारलेल्या प्रश्नावर जुनैदने सांगितलं कि, “मी आतापर्यंत जवळपास ७-८ चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या आहेत. 'लाल सिंह चढ्ढा' या सिनेमाची ऑडिशनही मी दिली होती. मी तिच्याबरोबर लाल सिंग चड्ढाच्या ऑडिशनमध्ये काम केलं होतं. ती माझ्या आईच्या भूमिकेत होती. मी तिच्याबरोबर एक सीन केला होता त्यामुळे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की ती आमच्या कुटुंबातील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे." असं जुनैदने यावेळी सांगितलं.

आमिर आणि किरण यांच्यापैकी कोण उत्तम अभिनय करत याबद्दल विचारल्यावरही जुनैद त्याच्या उत्तरावर ठाम राहिला आणि किरणचं त्यांच्या घरातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे असं तो म्हणाला. "त्यांना माहित आहे, अशी मला खात्री आहे. आता ते स्वत: हे कबूल करणार की नाही याची कल्पना नाही. पण ती नक्कीच आमच्या कुटुंबातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे." असं तो यावेळी म्हणाला.

दरम्यान जुनैदच्या आगामी सिनेमाबद्दल विचारायचं झाल्यास जुनैद साई पल्लवी बरोबर एका सिनेमात काम करत असून ख़ुशी कपूरबरोबरही एका रोमँटिक सिनेमा तो दिसणार आहे. जुनैद हा आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांचा मुलगा आहे. त्याला आयरा नावाची लहान बहीण आहे. २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला. तर आमिरने २००५ साली किरण रावशी लग्न केलं पण त्या दोघांनीही २०२१ मध्ये घटस्फोट घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT